TRENDING:

Love Horoscope: सिंह राशीत चंद्र आल्यानं या राशींची लव्ह लाईफ झकास; जाणून घ्या सर्व राशींची प्रेमकुंडली

Last Updated:

Love Horoscope : आजचं 'ओरॅकल स्पीक्स' सर्व 12 राशींसाठी भाग्य, करिअर, आरोग्य या बाबतीत आज काय होऊ शकतं, याची झलक देतं आहे. मेष राशीच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस हा सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा असेल, ज्यामुळे त्यांना त्यांच्या जीवनातील विविध पैलूंमध्ये प्रगती करण्यास मदत मिळेल. वृषभ राशीच्या व्यक्तींनी नातेसंबंधांना महत्त्व द्यावं. सौंदर्याची स्तृती करा. मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस बुद्धिमतेला चालना देणारा व मनमोकळा सुसंवाद वाढवणारा आहे. कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस भावनिक नातं घट्ट करण्याच्या दृष्टिनं चांगला आहे. सिंह राशीच्या व्यक्ती प्रेमाचा आनंद घेतील. कन्या राशीच्या व्यक्तींनी तपशिलाकडे लक्ष केंद्रित करावे. कामातील अडथळ्यांवर मात करण्यास ते उपयुक्त ठरेल. तूळ राशीच्या व्यक्तींसाठी प्रेमामध्ये सुसंवाद वाढवणारा दिवस आहे. घरात शांतता राहील. वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस नातेसंबंध घट्ट करणारा आहे. धनू राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस हा साहसी अनुभव देणारा ठरेल. प्रवासाचे नियोजन करण्यास योग्य वेळ आहे. मकर राशीच्या व्यक्तींसाठी व्यावहारीक दृष्टिकोन ठेवणं महत्त्वाचं ठरेल. कुंभ राशीच्या व्यक्ती क्रिएटिव्हिटीला प्राधान्य देतील. मीन राशीच्या व्यक्तींनी स्वत:च्या अंतःप्रेरणेवर विश्वास ठेवावा, घरामध्ये शांतता ठेवा. आता भाग्यवान संख्या, रंग आदींसह आजचा दिवस कसा जाईल, हे जाणून घेऊ. (21 मार्च 2024)

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मेष (Aries)
News18
News18
advertisement

आजचा दिवस तुमच्यासाठी चैतन्य वाढवणारा असेल, जे तुम्हाला तुमच्या जीवनातील सर्व क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यास मदत करेल. तुमच्या जोडीदाराची प्रेमाबाबत इच्छा प्रबळ होत असल्यानं तुमचं नातं अधिक घट्ट होईल. तुमच्या घरात सुरक्षेची भावना पुन्हा निर्माण होईल. ऑफिसमध्ये कामात आव्हानं निर्माण होऊ शकतं, परंतु संकल्पाच्या बळावर तुम्ही त्यावर मात करू शकता. सध्या तुम्ही तुमचा एखादा प्रवासाचा प्लॅन पुढे ढकलला असला तरी आजचा दिवस हा तुम्हाला नवीन रोमांचक अनुभव देणारा ठरेल. स्वतःची काळजी घ्या. तुमचं लक्ष्य कायम ठेवा, जेणेकरून तुम्ही भविष्यासाठी तुमचं ध्येय पूर्ण करू शकाल.

advertisement

Lucky Number : 57

Lucky Colour : Red

Lucky Stone : An Onyx

वृषभ (Taurus)

आजचा दिवस हा तुमच्यासाठी उत्तम आहे. तुमच्या सभोवतालच्या सौंदर्याची प्रशंसा करा. तुमचे प्रेमसंबंध जसजसे पुढे जातील, तसतसे तुम्ही तुमच्या जोडीदाराशी अधिक भावनिकरित्या जोडले जाताल. विश्रांती मिळावी, यासाठी घरात शांत वातावरण राहिल, याची काळजी घ्या. ऑफिसमध्ये काम करताना तुमच्या संयमाची परीक्षा होऊ शकते, परंतु धीर धरा, यश नक्की मिळेल. प्रवासाच्या दृष्टिनं सुट्टीच्‍या प्‍लॅन करताना सातत्यानं अडथळे येत असले तरीही जवळच्‍या ठिकाणांना भेट देण्यासाठी या संधीचा उपयोग करा. तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा, कारण तुम्ही तुमच्या भविष्यातील महत्त्वाकांक्षा पूर्ण करू शकता.

advertisement

Lucky Number : 16

Lucky Colour : Green

Lucky Stone : An White Sapphire

मिथुन (Gemini)

आजचा दिवस तुमच्यासाठी बौद्धिकदृष्ट्या महत्त्वाचा राहिल. प्रेमाच्या बाबतीत नात्यातील सुसंवाद ही गुरुकिल्ली ठरेल. क्रिएटिव्हीटी दाखवा, त्यासाठी ही योग्य वेळ आहे. ऑफिसमध्ये कामात अडचणी येऊ शकतात, पण तुमची अनुकूलता तुम्हाला उत्तरे शोधण्यासाठी सक्षम करेल. तुम्ही नियोजित प्रवास पुढं ढकलला असल्यास आज मिळणारा वेळ हा चांगल्या कामासाठी वापरा. तुमची कौशल्य वाढवण्यासाठी ऑनलाइन कोर्स करा. शारीरिक व मानसिक आरोग्याला प्राधान्य द्या. तुमची उद्दिष्टे पूर्ण होण्यासाठी योग्य वेळ असून त्याकडे लक्ष द्या.

advertisement

Lucky Number : 35

Lucky Colour : Yellow

Lucky Stone : Turquoise Jewellery

कर्क (Cancer)

आजचा दिवस भावनिकदृष्ट्या तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. आज तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा. नात्यामध्ये तुमच्या भावना प्रामाणिकपणे व्यक्त करा. घरामध्ये शांतता ठेवा, ते आरामदायक बनवा. ऑफिसमध्ये काम करताना तुम्हाला संयम ठेवावा लागेल. परंतु योग्य दिशेनं जाण्यासाठी तुमच्या जिद्दीवर विश्वास ठेवा. प्रवासाची योजना करण्यासाठी चांगली वेळ आहे. नवीन अनुभव निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करा. स्वत:ची काळजी घ्या. आरोग्याची काळजी घ्या. तुमची भविष्यातील उद्दिष्टे गाठण्याच्या दृष्टिनं तुम्हाला कोणाकडून तरी प्रेरणा मिळू शकेल.

advertisement

Lucky Number : 21

Lucky Colour : Silver

Lucky Stone : A Pearl

सिंह (Leo)

आजचा दिवस हा इतरांना तुमचा करिष्मा दाखवणारा असेल. आज प्रेमातील उत्कटता वाढवणारा दिवस आहे. जोडीदारावरील प्रेम व्यक्त करा. घरात सकारात्मक वातावरण राहिल, यासाठी काळजी घ्या. ऑफिसमध्ये कामात अडचणी येण्याची शक्यता आहे. परंतु तुमचा आत्मविश्वास तुम्हाला त्यातून मार्ग काढण्यास मदत करेल. तुमच्या जवळच्या ठिकाणांना भेट देण्यासाठी वेळ काढा. प्रवासाचं नियोजन करण्यासाठी योग्य वेळ आहे. व्यायाम करा. तुम्ही तुमची भविष्यातील ध्येय साध्य करू शकता. उत्साहानं त्यांना सामोरे जा.

Lucky Number : 9

Lucky Colour : Gold

Lucky Stone : Amber

एप्रिलमध्ये 3 राशींवर होईल मंगळ-शुक्राची कृपा, राजासारखं जगतील आयुष्य!

कन्या (Virgo)

आज तुम्ही कामातील अचूकतेकडे लक्ष दिल्यास त्याचा अधिक फायदा होईल. आजचा दिवस हा जोडीदारासोबत तुमचं नातं अधिक घट्ट करणारा ठरेल. त्यासाठी तुमचं लक्ष मनमोकळा संवाद साधण्यावर ठेवा. घरातील गोंधळ थांबवा. कुटुंबामध्ये संघटीत भावना तयार व्हावी, यासाठी पुढाकार घ्या. ऑफिसमध्ये कामात अडचणी येतील, परंतु तुम्ही तुमची विश्लेषणात्मक क्षमता वापरून त्यावर मात करू शकता. प्रवासाच्या दृष्टिनं तुमचे पर्याय मर्यादित असले तरी आत्मनिरीक्षण आणि विकासासाठी या वेळेचा फायदा घ्या. आरोग्याच्या दृष्टिने काळजी घ्या. विश्रांती व तणाव कमी करण्याला प्राधान्य द्या.

Lucky Number : 13

Lucky Colour : Navy Blue

Lucky Stone : An Emerald

तूळ (Libra)

दैनंदिन जीवनात समतोल राखणं, हे आज तुमचं मार्गदर्शक तत्व असेल. तुम्ही प्रेमात असता, तेव्हा इतरांशी करार करण्याचा प्रयत्न करता. आजही तसाच अनुभव येईल. घरामध्ये शांतता ठेवा. तुमच्या सौंदर्यविषयक संवेदना प्रतिबिंबित करण्यासाठी आज योग्य वेळ आहे. ऑफिसमध्ये कामात काही अडचणी येतील. परंतु तुमची मुत्सद्देगिरी तुम्हाला त्या हाताळण्यास अनुमती देईल. नियोजनानुसार प्रवास करण्याऐवजी विविध संस्कृतींतील लोकांशी संपर्क प्रस्थापित करण्यावर भर द्या. तुमची भविष्यातील ध्येय उज्ज्वल आहेत, फक्त त्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रक्रियेवर विश्वास ठेवा, फायद्याचं ठरेल.

Lucky Number : 94

Lucky Colour : Pink

Lucky Stone : Rhodonite Crystal

वृश्चिक (Scorpio)

आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र आहे. तुमची स्वभावातील तीव्रता हिच आज तुमची प्रेरणा असेल. प्रेमाच्या बाबतीत आजचा दिवस जोडीदारासोबतचे नातेसंबंध मजबूत करण्यासाठी योग्य आहे. घरामध्ये भावनिक वातावरण राहावे, यासाठी प्रयत्न करा. ऑफिसमध्ये कामात विविध अडचणी येतील. पण तुमची लवचिकता तुम्हाला त्यातून मार्ग काढण्यास सक्षम करेल. तुमच्‍या प्रवासाच्या प्‍लॅनवर मर्यादा असल्या तरीही तुमच्‍या स्‍वत:च्‍या मानसिकतेचं परीक्षण करण्‍यासाठी या संधीचा वापर करा. मानसिक व भावनिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करा. शरीराची काळजी घ्या. तुमचं भविष्यातील उद्दिष्टं साध्य करण्यासाठी लक्ष केंद्रित करा, फायद्याचं ठरेल.

Lucky Number : 18

Lucky Colour : Maroon

Lucky Stone : Garnet

शुक्राची महादशा सुरू असेल तर 'हे' उपाय करा; जीवनात येईल सुख-समृद्धी

धनू (Sagittarius)

तुमची साहसाची भावना आज तुम्हाला मार्ग दाखवण्यास उपयुक्त ठरेल. आज स्वतःला लवचिक ठेवणं फायद्याचं ठरेल. प्रेमात येणाऱ्या नवीन अनुभवांचा स्वीकार करा. तुमच्या क्रिएटिव्ह व्यक्तिमत्त्वाला मूर्त स्वरूप देणारं वातावरण घरामध्ये तयार करणे फायद्याचं ठरेल. ऑफिसमध्ये काम करताना विविध आव्हानं येऊ शकतात, परंतु तुमची सकारात्मकता तुम्हाला मूळ उत्तर शोधण्यास सक्षम करेल. प्रवासाच्या दृष्टिनं आजचा दिवस प्रवासाबाबत तुमचा नवीन दृष्टिकोन तयार करणारा असेल. निसर्गाशी संबंधित ॲक्टिव्हिटीमध्ये व्यस्त रहा. तुमच्या भविष्यातील महत्त्वाकांक्षा उज्ज्वल दिसत असल्यानं यशावर लक्ष केंद्रित करा.

Lucky Number : 21

Lucky Colour : Purple

Lucky Stone : Amazonite

मकर (Capricorn)

तुमच्यातील वास्तववादीपणा हाच तुमचा आज खरा मार्गदर्शक ठरेल. लव्ह लाइफच्या बाबतीत तुमची समर्पण भावना व स्थिरता तुमचं जोडीदारासोबतचं नातं अधिक मजबूत करतील. तुमची दीर्घकालीन उद्दिष्टे साध्य करण्यास प्राधान्य द्या त्या दृष्टिने प्रयत्न करा. ऑफिसमध्ये कामाच्या ठिकाणी अडचणी येऊ शकतात. परंतु तुमची दृढता तुम्हाला मदत करेल. प्रवास मर्यादित होणार असला तरीही भविष्यातील यशाची उद्दिष्टे तयार करण्यासाठी तो उपयुक्त ठरेल. स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी संतुलित जीवनशैली ठेवा. तुमचं भविष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी शिस्त पाळा, फायद्याचं ठरेल.

Lucky Number : 31

Lucky Colour : Brown

Lucky Stone : A Tiger's Eye

अनोखी युती होणार 12 वर्षांनी, बुध-गुरूमुळे चमकणार 'या' राशींचं भाग्य

कुंभ (Aquarius)

तुमच्या वेगळ्या दृष्टिकोनामुळे आज तुम्ही प्रसिद्धीच्या झोतात येऊ शकता. नातेसंबंधांतील वेगळेपण स्वीकारून तुमच्यातील गुणांचा आदर करणारा जोडीदार शोधा. तुमच्या कुटुंबात क्रिएटिव्ह आणि नाविन्यास प्रोत्साहन दिलं जाईल, याची काळजी घ्या. ऑफिसमध्ये कामाच्या ठिकाणी समस्या निर्माण होऊ शकतात. परंतु विचार करण्याची तुमची क्षमता तुम्हाला उत्तर शोधण्यास मदत करेल. सध्याच्या वेळेचा उपयोग हा नवीन संकल्पनांचा शोध घेण्यासाठी व तुमचं ज्ञान वाढवण्यासाठी करा. प्रवासाच्या दृष्टिनं केलेलं नियोजन पुढं ढकललं जाऊ शकतं. तुमच्या भविष्यासाठीच्या योजना प्राप्तीची गती वाढवण्यासाठी ही योग्य वेळ असून आता न थांबता त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. त्यासाठी ही योग्य वेळ आहे.

Lucky Number : 2

Lucky Colour : Turquoise

Lucky Stone : Aquamarine

मीन (Pisces)

तुमचा स्वभावगुण हा आज तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या संशयातून मार्ग काढण्यास मदत करेल. आज भावनिक संबंधांना प्राधान्य द्या. सहानुभूतीपूर्ण स्वभाव स्वीकारा. घरामध्ये शांतता राहिल, यासाठी काळजी घ्या. ऑफिसमध्ये कामात अडचणी येऊ शकतात, परंतु तुमची सहानुभूती तुम्हाला त्यातून मार्ग काढण्यास मदत करेल. तुमच्‍या प्रवासाच्या योजना अचानक पूर्ण झाल्या तरीही तुमच्‍या कल्पनेचा वाव मिळावा, यासाठी तुमच्या कलात्मक प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करा. आरोग्याची काळजी घ्या. स्वत:ची काळजी घेण्यास प्राधान्य द्या. तुम्ही तुमची भविष्यातील उद्दिष्टे साध्य करू शकता. त्यासाठी फक्त तुमचं हृदय जे सांगते, त्यावर विश्वास ठेवा.

Lucky Number : 75

Lucky Colour : Marine Green

Lucky Stone : A Hematite

मराठी बातम्या/राशीभविष्य/
Love Horoscope: सिंह राशीत चंद्र आल्यानं या राशींची लव्ह लाईफ झकास; जाणून घ्या सर्व राशींची प्रेमकुंडली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल