अनोखी युती होणार 12 वर्षांनी, बुध-गुरूमुळे चमकणार 'या' राशींचं भाग्य, होणार मोठा लाभ

Last Updated:

बुध सध्या मीन राशीत विराजमान आहे. होळीच्या आधी बुध मेष राशीत प्रवेश करणार आहे. बुधाने प्रवेश करताच मेष राशीमध्ये गुरू आणि बुध यांची युती तयार होईल.

News18
News18
मुंबई : काही राशींसाठी येणारा काळ खूप सुख व समृद्धीचा ठरणार आहे, या राशींची रखडलेली कामं पूर्ण होतील. नोकरदार वर्ग कौतुकास पात्र ठरणार असून, व्यावसायिकांसाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार होणार आहेत. या सर्व गोष्टी बुध व गुरूच्या अनोख्या युतीमुळे घडणार आहेत. काही दिवसांत बुधाचं राशिपरिवर्तन होणार आहे.
बुध सध्या मीन राशीत विराजमान आहे. होळीच्या आधी बुध मेष राशीत प्रवेश करणार आहे. बुधाने प्रवेश करताच मेष राशीमध्ये गुरू आणि बुध यांची युती तयार होईल. ही युती थोडेथोडके नाही तर सुमारे 12 वर्षांनी मेष राशीमध्ये तयार होत आहे, असं मानलं जात आहे. 26 मार्च रोजी ग्रहांचा राजकुमार मेष राशीत प्रवेश करणार आहे, जो 8 एप्रिलपर्यंत या राशीत राहील. मेष राशीमध्ये बुध आणि गुरूच्या युतीमुळे कोणत्या राशींचं भाग्य उजळू शकतं ते जाणून घेऊ. या संदर्भात 'लाइव्ह हिंदुस्थान'ने वृत्त दिलं आहे.
advertisement
सिंह राशी
सिंह राशीच्या लोकांसाठी गुरू आणि बुध यांची युती फायद्याची ठरू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांचं कौतुक होईल, ते कौतुकास पात्र असतील. तर व्यावसायिकांसाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार होतील. काही किरकोळ समस्या येऊ शकतात, ज्या तुमच्या जोडीदाराच्या मदतीने सहज सोडवता येतील. तुम्ही जितके खंबीर राहाल तितकेच जास्त यश तुम्ही मिळवू शकाल. या राशीच्या लोकांनी खंबीर राहणं महत्त्वाचं आहे.
advertisement
धनू राशी
धनू राशीच्या लोकांसाठी गुरु आणि बुध यांची युती शुभ मानली जात आहे. बुध आणि गुरूच्या शुभ प्रभावामुळे या राशीच्या लोकांची रखडलेली व प्रलंबित सर्व कामं पुन्हा सुरू होतील. कोणतंही नवीन काम सुरू करायचं असेल तर हा काळ अतिशय शुभ मानला जातो. तुम्हाला सुख आणि संपत्तीचा लाभ मिळेल. या काळात आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला विसरू नका.
advertisement
कर्क राशी
कर्क राशीच्या लोकांसाठी गुरू आणि बुध यांची युती खूप लाभदायक मानली जात आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमचे मित्र आणि बॉस यांचे पूर्ण सहकार्य लाभेल. याचबरोबर तुम्हाला आर्थिक अडचणींपासून दिलासा मिळेल आणि तुम्ही गुंतवणूक करण्यासाटी नवीन पर्यायांचा विचार करू शकता. या काळात तुमच्या परदेश प्रवासाचे योग तयार होत आहेत.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
अनोखी युती होणार 12 वर्षांनी, बुध-गुरूमुळे चमकणार 'या' राशींचं भाग्य, होणार मोठा लाभ
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement