Amalaki Ekadashi 2024: रवि योगात आज आमलकी एकादशी! पहा मुहूर्त, पूजा विधी, धार्मिक महत्त्व
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Amalaki Ekadashi 2024: रवियोगासोबतच आज अनेक शुभ योगही तयार होत आहेत. जाणून घेऊया आमलकी एकादशीचा शुभ मुहूर्त, पूजा करण्याची पद्धत, उपवास सोडण्याची वेळ इ.
मुंबई : हिंदू दिनदर्शिकेनुसार फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला आमलकी एकादशी म्हणतात. हिला आवळा एकादशी असेही संबोधतात. या दिवशी भगवान विष्णूची पूजा करण्याबरोबरच उपवास करण्याची परंपरा आहे. आज आवळ्याच्या झाडाची पूजा करून आवळा खाल्यानं सुख मिळते आणि प्रत्येक दुःखापासून मुक्ती मिळते, अशी श्रद्धा आहे. आमलकी एकादशी आज 20 मार्च 2024 रोजी येत आहे. रवियोगासोबतच आज अनेक शुभ योगही तयार होत आहेत. जाणून घेऊया आमलकी एकादशीचा शुभ मुहूर्त, पूजा करण्याची पद्धत, उपवास सोडण्याची वेळ इ.
आमलकी एकादशी 2024 शुभ मुहूर्त -
फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाची एकादशी सुरू होते - 20 मार्च 2024 रोजी 12:21 AM
एकादशी तिथी समाप्त होईल - 21 मार्च 2024 रोजी 02:22 AM
आमलकी एकादशी पूजेचा शुभ मुहूर्त 20 मार्च रोजी सकाळी 6.25 ते 9:27 पर्यंत आहे.
आमलकी एकादशीचे व्रत सोडणे -
21 मार्च 2024 रोजी दुपारी 01:41 ते 04:07 पर्यंत उपवास सोडू शकता.
advertisement
आमलकी एकादशीला शुभ योग -
हिंदू कॅलेंडरनुसार आमलकी एकादशीला अनेक शुभ योग तयार होत आहेत. या दिवशी रवि योगासह अतिगंड आणि पुष्य नक्षत्र तयार होत आहे. रवि योग सकाळी 06.25 पासून सुरू होईल, जो रात्री 10.38 वाजता समाप्त होईल. यासोबतच सकाळपासून सायंकाळी 05.01 वाजेपर्यंत अतिगंड योग आहे. याशिवाय पुष्य नक्षत्र रात्री 10.38 पर्यंत आहे.
advertisement
आमलकी एकादशीला आवळा वृक्षाची पूजा करावी -
आमलकी एकादशीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा करणे खूप शुभ मानले जाते. एकादशीच्या दिवशी आवळा वृक्षात भगवान विष्णूचा वास असतो, असे मानले जाते. आज आवळ्याच्या झाडाला फुलं, हार, अगरबत्ती आणि पाण्यासह दिवे लावून पूजा केल्यानं श्री हरी अत्यंत प्रसन्न होतो आणि सर्व प्रकारच्या दु:ख, वेदना आणि पापांपासून मुक्तता मिळते, असे मानले जाते.
advertisement
आमलकी एकादशी 2024 पूजा पद्धत -
आवळा एकादशीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठावे, स्नान करावे. यानंतर स्वच्छ वस्त्रे परिधान करून भगवान विष्णूचे ध्यान करत व्रत करण्याची प्रतिज्ञा घ्यावी. पूजा सुरू करताना लाकडी पाठावर पिवळे कापड पसरून श्री हरी विष्णूचे चित्र स्थापित करा. यानंतर आचमन करून पिवळे चंदन, अक्षत, फुले, हार सोबत बेसनाचे लाडू, खीर इत्यादी अर्पण करून जल व तुपाचा नैवेद्य ठेवा, दिवा व उदबत्ती लावून एकादशी व्रत कथेसह विष्णु चालीसा व मंत्राने आरती करावी. शेवटी चुकीबद्दल माफी मागावी. त्यानंतर दिवसभर उपवास केल्यानंतर शुभ मुहूर्तावर उपवास सोडावा.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 20, 2024 6:53 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Amalaki Ekadashi 2024: रवि योगात आज आमलकी एकादशी! पहा मुहूर्त, पूजा विधी, धार्मिक महत्त्व