एप्रिलमध्ये 3 राशींवर होईल मंगळ-शुक्राची कृपा, राजासारखं जगतील आयुष्य!

Last Updated:

जेव्हा एकाच राशीत 2 ग्रह एकत्र येतात तेव्हा त्यांची युती झाली, असं म्हणतात. आता एप्रिल महिन्यात मंगळ आणि शुक्र ग्रहाची युती निर्माण होतेय, त्यातूनच तयार होतोय धनयोग.

हा योग ज्यांना पावणार त्यांची आर्थिक भरभराट होणार.
हा योग ज्यांना पावणार त्यांची आर्थिक भरभराट होणार.
सर्वेश श्रीवास्तव, प्रतिनिधी
अयोध्या : ग्रहांचा वेळोवेळी राशीप्रवेश होतो आणि त्यातून वेगवेगळे योग निर्माण होतात, ज्यांचा परिणाम थेट मानवी जीवनावर होतो. म्हणूनच ज्योतिषशास्त्रात ग्रह, ताऱ्यांच्या स्थितीला विशेष महत्त्व आहे. येत्या एप्रिल महिन्यात असाच एक खास योग तयार होतोय. त्याचं नाव आहे 'महालक्ष्मी धनयोग'. नावावरूनच आपल्या लक्षात आलं असेल की, हा योग ज्यांना पावणार त्यांची आर्थिक भरभराट होणार. शुक्र आणि मंगळ ग्रहामुळे हा योग निर्माण होणार आहे.
advertisement
धनसंपत्तीचा कारक मानल्या जाणाऱ्या शुक्र ग्रहाचा कुंभ राशीत प्रवेश होईल. त्यापूर्वी 15 मार्चला मंगळ ग्रहाचा कुंभ प्रवेश झाला आहे. जेव्हा एकाच राशीत 2 ग्रह एकत्र येतात तेव्हा त्यांची युती झाली, असं म्हणतात. त्यामुळे आता एप्रिल महिन्यात कुंभ राशीत मंगळ आणि शुक्र ग्रहाची युती निर्माण होतेय आणि त्यातूनच तयार होतोय महालक्ष्मी धनयोग. ज्याचा सर्व 12 राशींवर परिणाम होईलच, परंतु 3 राशींसाठी हा योग एवढं सुख घेऊन येईल की, त्या राशींच्या व्यक्तींना अक्षरश: राजासारखं आयुष्य जगता येईल. त्या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या आहेत, पाहूया.
advertisement
मेष : आपल्यासाठी हा योग अत्यंत लाभदायी ठरणार आहे. आपल्याला अचानक धनलाभ होऊ शकतो. बऱ्याच काळापासून अडकलेले आपले पैसे आता परत मिळतील. कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल.
मिथुन : आपल्यासाठी महालक्ष्मी धनयोग अत्यंत शुभ ठरेल. आपल्याला व्यवसायात चांगला नफा मिळेल. आपली आर्थिक स्थिती भक्कम होईल. मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतील. नवं काम सुरू करायचं असेल तर हा काळ उत्तम आहे. व्यापार विस्तारेल. दाम्पत्य जीवनात सुख येईल.
advertisement
वृश्चिक : आपल्यासाठी महालक्ष्मी धनयोग लाभदायी ठरणार आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण निर्माण होईल. नोकरी करत असाल तर बढती मिळेल. मालमत्ता खरेदीचाही योग आहे. कामानिमित्त प्रवास होण्याची शक्यता आहे. त्यातूनही फायदाच होईल.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला करा फॉलो…या लिंकवर क्लिक करा
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
एप्रिलमध्ये 3 राशींवर होईल मंगळ-शुक्राची कृपा, राजासारखं जगतील आयुष्य!
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement