वृषभ : तुमच्यावर प्रेम करणाऱ्या आजूबाजूला असलेल्या व्यक्तींच्या प्रभावात उजळून निघाल. यात तुमचा जोडीदार आणि कुटुंबीयांचा समावेश असेल. कम्पॅनियनशिपमधून आनंद मिळेल. मजेत राहा, हसा. जुन्या दिवसांची आठवण करा आणि भविष्याचा विचार करा. आजच्या दिवशी प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्या.
मिथुन : कामाशी निगडित परिस्थितीमध्ये काही इंटरेस्टिंग व्यक्तींशी भेट होईल. कोणी तरी नव्या व्यक्तीने तुमचं लक्ष वेधून घेतल्याचं तुमच्या लक्षात येईल. तुमच्या कामावरचं सगळं लक्ष काढून घेऊ नका; पण तुमच्या असं लक्षात येईल की तुम्हाला दिलेली सगळी कामं पूर्ण करण्यात आज तुम्हाला अतिरिक्त अडचणी येतील. त्या व्यक्तीला तुमच्यात रस आहे की नाही हे एका सहकाऱ्याच्या माध्यमातून काढून घ्यायला काय हरकत आहे?
advertisement
कर्क : तुमचं प्रेमजीवन इंटरेस्टिंग धाडसांनी भरलेलं असेल आणि नव्या पोटेन्शियल रोमँटिक पार्टनरची अपेक्षा करू शकता. रोमान्सच्या शक्यता आज उज्ज्वल आहेत. अलीकडच्या कार्यक्रमांवर व्यक्त व्हाल. प्रेमाच्या दुनियेत काय होईल याचा अंदाज तुम्ही कायमच बांधू शकत नाही हे तुमच्या लक्षात येईल. चांगल्या काळाचा आनंद घ्या.
आत्तापर्यंत बिनबोभाट चालू होतं! पण आता या राशींवर साडेसाती; कामामध्ये शंभर विघ्न
सिंह : तुम्ही जिथे कमीत कमी अपेक्षा केली असेल अशा ठिकाणी, म्हणजे डेटिंग वेबसाइटवर खास व्यक्ती भेटेल. ही व्यक्ती परदेशात राहणारी असेल. धीर सोडू नका. कारण यामुळे तुमची क्षितिजं रुंदावू शकतील.
कन्या : काही काळापासून तुम्ही रोमँटिक पार्टनरच्या शोधात असाल आणि त्यात यश मिळालं नसेल, तर आज नशीब तुम्हाला साथ देऊ शकेल. या बाबतीत आज सकारात्मक घडामोडी घडू शकतात. डोळे उघडे ठेवा आणि तुमच्या सोर्सेकडे काही लीड्स आहेत का ते पाहा. जे मिळेल त्यामुळे तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसू शकतो.
तूळ : आज विरुद्धलिंगी मित्र बनवाल. रोमान्सची शक्यता तीव्र आहे. बाहेर जाऊन लव्ह लाइफसाठी सोशलाइज करू शकता, तेव्हा घरात बसून राहू नका. नव्या आणि इंटरेस्टिंग व्यक्तींशी भेट होईल, तेव्हा असं वाटेल की आज रात्री तुमच्यासाठी काय वाढून ठेवलं आहे. त्यांपैकी एक तरी व्यक्ती तुमचं लक्ष वेधून घेईल. तुमचा रस व्यक्त करण्यात संकोचू नका. काही तरी उत्साहवर्धक घडणार आहे.
लोक गैरफायदा घेतात! या 5 गोष्टी गुप्त राहण्यातच आपलं भलं, चाणक्यांनी सांगितलंय
वृश्चिक : आज नवे मित्र बनवाल. तो तुमच्या भविष्यातल्या यशाचा मार्ग दाखवील. नशिबवान असलात, तर ही व्यक्ती तुमची उत्तम रोमँटिक पार्टनरही ठरू शकते. या रिलेशनशिपच्या शक्यतांप्रति मन खुलं ठेवा. तुमच्या इच्छा आणि स्वप्नं या व्यक्तीशी शेअर करा आणि भविष्यात काय आहे ते पाहा.
धनू : आज सिंगल व्यक्तींची ऑनलाइन कोणाशी तरी भेट होईल. भौगोलिकदृष्ट्या एकमेकांपासून दूर असलेल्या व्यक्तींची भेट होण्याची शक्यता आहे. पुढे जाऊन ऑनलाइन सर्च करा; पण कोणाशी बोलताय हे काळजीपूर्वक पाहा. तुमच्या सुरक्षेशी तडजोड करू नका. आज सुरक्षितपणे ऑनलाइन सोशलायझिंग करा.
मकर : आज खूप आकर्षक दिसाल. सगळ्यांची मनं जिंकाल. आज रात्री पार्टनरसह बाहेर गेलात, तर पार्टीत तुम्ही लोकप्रिय ठराल. नक्की लक्ष वेधून घ्याल. चांगला पोषाख घाला, चांगले दिसा. कारण आज काही सरप्राइझेस मिळण्याची शक्यता आहे.
संकटांनी अजिबात खचलो नाही! या राशींचे आता भाग्य उजळणार; बुध-शुक्र ग्रहांची साथ
कुंभ : सिंगल पॅरेंट असलात, तर तुम्हाला दुसरा लाइफ पार्टनर कधीच मिळणार नाही असं तुम्हाला वाटत असेल; मात्र आज कोणी तरी इंटरेस्टिंग व्यक्ती तुमच्या आयुष्यात येईल. ती व्यक्ती तुमच्यासाठीच असेल असं गृहीत धरू नका; मात्र तुमच्या मनात काही ठिणग्या उडतील. त्या बऱ्याच दिवसांपासून व्यक्त झाल्या नव्हत्या.
मीन : सिंगल असलात, तर आज लोकांना भेटण्याचे अनेक मार्ग शोधाल. ऑनलाइन पर्यायांचा विचार करत असाल. त्यात डेटिंग आणि मॅट्रिमोनियल वेबसाइट्सचा समावेश असेल. त्या तुम्हाला उपयोगी ठरतील; मात्र आपली माहिती देताना खूप सावध राहिलं पाहिजे. वैयक्तिक माहिती आणि संपर्काचे तपशील सुरक्षित ठेवा. सावधगिरी बाळगून संवाद साधा.
