TRENDING:

Best Mulank for Friendship: सच्चा दोस्त तोच! या 4 बर्थडेट असणारे लोक अडचणीत पाठीशी उभे राहतात

Last Updated:

Friend Mulank Astrology: अंकशास्त्रात 3 मूलांक असलेल्या व्यक्तींना सर्वात विश्वासार्ह मानलं जातं. हे लोक इतरांच्या गुपित गोष्टी जपून ठेवतात. त्यांची समजून घेण्याची शक्ती उच्च दर्जाची असते आणि समोरच्याची चालाकी ते सहज ओळखू शकतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई :  प्रत्येक माणसाचे मित्र असतात. मित्रांशिवाय जीवन असू शकत नाही, कारण माणूस हा समाजशील प्राणी आहे. एखाद्याचं मित्रमंडळ खूप मोठं असतं, तर कोणाला मोजकेच म्हणजे 1, 2 किंवा 4-5 मित्र आवडतात. पण प्रत्येकाची एकच इच्छा असते की, आपल्या संकटाच्या काळात मित्राने खंबीरपणे साथ द्यावी. मग ते संकट पैशांचं असो किंवा रिलेशनमधील दुराव्याचं. पण तुम्ही पाहिलं असेल की सगळेच मित्र मदतीला धावून येत नाहीत. काही जण फक्त सुखाचे सोबती असतात आणि दुःख येताच वाफेसारखे गायब होतात.
News18
News18
advertisement

अंकशास्त्रानुसार सर्वात विश्वासार्ह मूलांक कोणता हे आपण व्यक्तीच्या जन्मतारखेवरून ठरवू शकतो. तुमच्या मित्रांपैकी सगळ्यात जास्त भरवशाचा मित्र कोण आहे, हे त्यांच्या जन्मतारखेवरून ओळखता येतं. अंकशास्त्रात 3 मूलांक असलेल्या व्यक्तींना सर्वात विश्वासार्ह मानलं जातं. हे लोक इतरांच्या गुपित गोष्टी जपून ठेवतात. त्यांची समजून घेण्याची शक्ती उच्च दर्जाची असते आणि समोरच्याची चालाकी ते सहज ओळखू शकतात. तुम्हाला कळणारही नाही पण तुमच्या वागण्यावरून ते तुमच्या मनातलं ओळखतात.

advertisement

बायकोला सांगितल्याशिवाय कधीही करू नये हे एक काम; धनलक्ष्मीची अवकृपा

मूलांक 3 असणारे लोक खरे मित्र ठरतात कारण त्यांना इतरांना मदत करायला आवडतं. जर तुम्ही एखाद्या अडचणीत असाल आणि तुमचा एखादा मित्र 3 मूलांकाचा असेल, तर त्याला नक्की फोन करून बघा. तुमच्यात कित्येक महिने बोलणं झालं नसलं तरीही, तुम्ही हाक मारल्यावर तो मदतीला धावून येईल. वेळ कोणतीही असो आर्थिक असो वा मानसिक, तो तुमच्या पाठीशी उभा राहील. म्हणूनच असं म्हटलं जातं की प्रत्येकाचा किमान एक तरी मित्र 3 मूलांकाचा असावा.

advertisement

मेष राशीत शुक्र गोचर! या 5 राशींचे भाग्य चमकणार; नवीन कार दारात, धनलाभाचे योग

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
विम्यासाठी तो प्रकार, थांबा! चूक अंगलट येईल, एक रुपायाही सुद्धा भेटणार नाही, Video
सर्व पहा

मूलांक 3 चा स्वामी ग्रह देवगुरु बृहस्पती आहे. हे लोक खूप चांगले मित्र असतात आणि इतरांना सल्लाही खूप मोलाचा देतात. ते समोरच्याच्या भावनांची कद्र करतात आणि त्यांचं म्हणणं पूर्ण शांतपणे ऐकून घेतात. कधी, काय आणि कुणाला बोलायचं याचं भान त्यांना चांगलं असतं. हे लोक कोणालाही फसवित नाहीत आणि इतरांच्या चुका माफ करण्याचं मोठं मन त्यांच्याकडे असतं. या मूलांकाच्या लोकांनी नेहमी नैतिकता, नियम आणि धर्माच्या मार्गावर चाललं पाहिजे, कारण या मार्गावरून भरकटल्यास त्यांचं स्वतःचं नुकसान होतं.

advertisement

मराठी बातम्या/राशीभविष्य/
Best Mulank for Friendship: सच्चा दोस्त तोच! या 4 बर्थडेट असणारे लोक अडचणीत पाठीशी उभे राहतात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल