रोहिणी नक्षत्राचे स्वरूप - रोहिणी नक्षत्र वृषभ राशीत येते आणि ते सर्वात आकर्षक नक्षत्र मानले जाते. शास्त्रांमध्ये याचा संबंध विकास आणि भरभराटीशी जोडला गेला आहे. या नक्षत्रात चंद्र सर्वाधिक बलवान असतो, ज्यामुळे मानसिक संतुलन आणि भौतिक सुखांची प्राप्ती होते. जीवनात स्थिरता मिळवण्यासाठी आणि स्वतःच्या कामातून ओळख निर्माण करण्यासाठी हे नक्षत्र अत्यंत पूरक मानले जाते.
advertisement
ज्योतिषीय महत्त्व आणि स्वामी ग्रह - रोहिणी नक्षत्राचा स्वामी ग्रह चंद्र आहे. चंद्र हा मन, भावना आणि शांतीचा प्रतीक असल्याने या नक्षत्रात जन्मलेले लोक संवेदनशील आणि नात्यांना महत्त्व देणारे असतात. कुंडलीत चंद्र भक्कम असेल, तर व्यक्तीला आत्मविश्वास आणि कल्पनाशक्ती मिळते. नवीन कामाची सुरुवात, खरेदी, प्रवास किंवा विवाहासाठी हे नक्षत्र अत्यंत शुभ मानले जाते.
सिंह कन्या तूळ वृश्चिक राशींचे साप्ताहिक राशीफळ; आनंदी वार्ता कोणाला? महिनाखेरीस
स्वभाव आणि व्यक्तिमत्व - या नक्षत्रात जन्मलेले लोक दिसायला देखणे आणि स्वभावाने मृदू असतात. सुंदर गोष्टींकडे ते लवकर आकर्षित होतात आणि त्यांना आयुष्यात स्थिरता आवडते. त्यांच्यासाठी कुटुंब खूप महत्त्वाचे असते. मात्र, अधिक भावूक स्वभावामुळे ते लवकर दुखावले जाऊ शकतात. योग्य मार्गदर्शन मिळाल्यास हे लोक आयुष्यात खूप प्रगती करतात.
करिअर आणि व्यवसाय - रोहिणी नक्षत्राचे लोक सर्जनशील क्षेत्रांत उत्तम कामगिरी करतात. कला, फॅशन, डिझाइन, चित्रपट, संगीत, लेखन, जाहिरात आणि शेतीशी संबंधित व्यवसायांत त्यांना यश मिळते. व्यापारामध्ये आपल्या गोड बोलण्याने आणि हुशारीने ते वेगळी ओळख निर्माण करतात.
आनंदवार्ता! रथसप्तमीला देवी लक्ष्मीची कृपा 5 राशींवर; धनयोग जुळल्याचा मोठा लाभ
कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन - विवाहासाठी हे नक्षत्र अनुकूल मानले जाते. या नक्षत्राचे लोक आपल्या जोडीदाराशी एकनिष्ठ असतात आणि त्यांच्याशी भावनात्मरित्या जोडलेले असतात. काहीवेळा अति अपेक्षांमुळे मतभेद होऊ शकतात, पण समजूतदारपणा दाखवल्यास त्यांचे नाते दीर्घकाळ टिकते आणि संतुलित राहते.
शुभ उपाय आणि नियम - या नक्षत्राचा शुभ प्रभाव वाढवण्यासाठी सोमवारी भगवान शंकराचा जलाभिषेक करावा. 'ॐ सोमाय नमः' या मंत्राचा 108 वेळा जप करणे फायदेशीर ठरते. तांदूळ, दूध किंवा पांढऱ्या वस्तूंचे दान करावे. शक्यतो पांढऱ्या किंवा फिकट रंगाचे कपडे परिधान करावेत. या नक्षत्रात लेखन, संगीत आणि सजावटीशी संबंधित कामे सुरू करणे चांगले असते, मात्र भावनेच्या भरात मोठे निर्णय घेणे टाळावे.
