मूलांक 1 - असलेल्या लोकांचा स्वामी ग्रह सूर्यच आहे, अशा परिस्थितीत तुमच्यासाठी हे वर्ष उत्कृष्ट ठरू शकते. तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल आणि तुम्ही तुमचे विचार लोकांसमोर उघडपणे मांडू शकाल. कौटुंबिक जीवनात चांगले बदल पाहायला मिळतील. या मूलांकाच्या बेरोजगार लोकांना नवीन वर्षात रोजगार मिळू शकतो. तुमच्या ऊर्जेचा योग्य वापर तुम्ही केला पाहिजे. शिक्षण क्षेत्रात या मूलांकाचे विद्यार्थी मोठी उपलब्धी मिळवू शकतात.
advertisement
मूलांक 3 - या मूलांक असलेल्या लोकांसाठी देखील वर्ष 2026 नवीन भेट घेऊन येईल. तुमच्या मूलांकाचा स्वामी गुरु आणि सूर्य यांच्यात मैत्री आहे, त्यामुळे तुम्हाला सूर्याच्या वर्षात चांगले अनुभव येऊ शकतात. भूतकाळात केलेल्या कामाचे चांगले फळ तुम्हाला मिळेल.
3 मूलांकाचे काही लोक परदेशात शिक्षण किंवा नोकरीसाठी जाऊ शकतात. घरातील ज्येष्ठांकडून तुम्हाला चांगला सल्ला मिळेल. आध्यात्मिक क्षेत्रात तुम्ही पुढे जाऊ शकता. आर्थिक बाजू सुधारेल.
मूलांक 9 - या मूलांकाचा स्वामी मंगळ ग्रह आहे आणि सूर्यासोबत मंगळाचे चांगले संबंध आहेत. तुम्ही साहस आणि पराक्रमाने भरलेले असाल. नवीन लोकांशी तुमची भेट होईल आणि या लोकांपासून तुम्हाला धनलाभ देखील होऊ शकतो. भाऊ-बहिणींसोबत तुमचे संबंध सुधारतील. आर्थिकदृष्ट्या तुम्ही संपन्न व्हाल आणि गुंतवणूक केलेले पैसे मोठी रक्कम बनून परत मिळू शकतात. करिअरच्या क्षेत्रातही तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. काही लोकांची पदोन्नती होऊ शकते.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
