TRENDING:

राशीचक्रातील पहिली रास 'मेष', का असते इतर 11 राशींपेक्षा खास? ऍस्ट्रोलॉजिस्टने थेट सर्वचं सांगितलं!

Last Updated:

राशीचक्रातील पहिली रास म्हणजे 'मेष'. अग्नी तत्वाची आणि 'मंगळ' ग्रहाचा प्रभाव असलेली ही रास आपल्या ऊर्जेसाठी आणि धाडसासाठी ओळखली जाते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Aries Personality : राशीचक्रातील पहिली रास म्हणजे 'मेष'. अग्नी तत्वाची आणि 'मंगळ' ग्रहाचा प्रभाव असलेली ही रास आपल्या ऊर्जेसाठी आणि धाडसासाठी ओळखली जाते. मेष राशीचे लोक नेमके कसे असतात, त्यांचे करिअर कोणते असते आणि आरोग्याच्या बाबतीत त्यांनी काय काळजी घ्यावी, याचे सविस्तर विश्लेषण ज्योतिषतज्ज्ञांनी मांडले आहे.
News18
News18
advertisement

व्यक्तिमत्त्व आणि दिसणं

मेष राशीच्या व्यक्ती साधारणपणे मध्यम ते उंच बांध्याच्या असतात. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच तेज आणि आत्मविश्वास असतो. त्यांचे कपाळ रुंद असून डोळे भेदक असतात. या राशीच्या व्यक्तींचे शरीर सुदृढ आणि लवचिक असते. यांच्या चालण्या-बोलण्यात एक प्रकारची घाई किंवा वेग जाणवतो.

स्वभाव आणि राहणीमान

धाडसी आणि निडर: मेष राशीचे लोक कोणालाही घाबरत नाहीत. नवीन आव्हाने स्वीकारणे त्यांना आवडते.

advertisement

स्वाभिमानी: यांना स्वतःच्या कष्टावर विश्वास असतो. कोणासमोर झुकणे किंवा लाचारी करणे यांना पटत नाही.

स्पष्टवक्ते: यांच्या मनात जे असते, तेच ओठावर असते. यामुळे कधीकधी लोक त्यांना उद्धट समजतात, पण ते मनाने साफ असतात.

राहणीमान: यांना टापटीप राहायला आवडते. गडद रंग, विशेषतः 'लाल' रंग या राशीच्या लोकांसाठी लकी मानला जातो. त्यांना आधुनिक जीवनशैली आणि नवीन गॅजेट्सची आवड असते.

advertisement

करिअर आणि आर्थिक स्थिती

मेष राशीच्या व्यक्ती उपजतच 'लीडर' असतात. कोणाच्या हाताखाली काम करण्यापेक्षा स्वतःच्या अटींवर काम करणे त्यांना आवडते.

यशस्वी क्षेत्रे: लष्कर, पोलीस दल, इंजिनिअरिंग, राजकारण, खेळाडू किंवा स्वतःचा व्यवसाय या क्षेत्रांत हे लोक चमकतात.

आर्थिक स्थिती: हे लोक पैसा कमवण्यात हुशार असतात, पण खर्च करतानाही त्यांचा हात सैल असतो. तरीही, त्यांच्याकडे कधीही पैशाची कमतरता भासत नाही, कारण ते कष्टाला घाबरत नाहीत.

advertisement

प्रेम आणि वैवाहिक जीवन

प्रेमाच्या बाबतीत मेष राशीच्या व्यक्ती अत्यंत प्रामाणिक आणि उत्कट असतात. ते आपल्या जोडीदाराचे खूप लाड करतात आणि त्याचे रक्षण करतात. मात्र, त्यांचा थोडा 'तामसी' स्वभाव किंवा राग नात्यात कधीतरी अडथळे आणू शकतो. सिंह आणि धनु राशीच्या व्यक्तींसोबत यांचे नाते सर्वात जास्त काळ टिकते.

आरोग्य

मेष राशीचा अंमल शरीरातील 'डोके' आणि 'चेहऱ्यावर' असतो. त्यामुळे या राशीच्या लोकांना वारंवार डोकेदुखी, मायग्रेन किंवा उष्णतेचे विकार होऊ शकतात. त्यांनी आपल्या आहारावर नियंत्रण ठेवणे आणि पुरेपूर पाणी पिणे आवश्यक आहे. अपघातातून डोक्याला दुखापत होणार नाही, याची त्यांनी काळजी घ्यावी.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याच्या दरात पुन्हा घसरण, तुरीचे वाढले भाव, सोयाबीनची काय स्थिती? Video
सर्व पहा

टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

मराठी बातम्या/राशीभविष्य/
राशीचक्रातील पहिली रास 'मेष', का असते इतर 11 राशींपेक्षा खास? ऍस्ट्रोलॉजिस्टने थेट सर्वचं सांगितलं!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल