6 क्रमांक हा त्या व्यक्तीचा कुटुंब आणि प्रेमाशी असलेला संबंध दर्शवितो. तो तुमच्या आयुष्यातील संपत्ती आणि पैशाचे देखील संकेत देतो. 6 हा आकडा आराम आणि चांगले प्रेम जीवन दर्शवतो.
advertisement
व्यवसायासाठी वापरत असलेल्या मोबाईल नंबरचा शेवटचा अंक 6 असणं शुभ मानलं जातं. तुम्हाला कॉल करणारा ग्राहक नीट बोलणारा सभ्य असेल आणि तुमच्याशी डील फायनल करेल. जे लोक विशेषतः मेकअप स्टुडिओ, ब्युटी पार्लर, सौंदर्यप्रसाधने इत्यादी सौंदर्याशी संबंधित काम करतात, त्यांनी मोबाईल नंबरचा शेवटचा अंक 6 ठेवून पाहावा. त्यांना महिला ग्राहकांकडून बरेच कॉल येतील. तुम्ही त्यांना योग्य किमतीत सेवा दिली तर तुम्हाला फायदा दिसू लागेल.
ज्या लोकांचा व्यवसाय वाटाघाटीशी संबंधित आहे, त्यांनी मोबाईल नंबरचा शेवटचा अंक 6 वापरावा. त्यांना याचा फायदा होण्याची शक्यता जास्त असते. ज्या सासू आणि सुनेचे पटत नाही, त्यांनी मोबाईल नंबरचा शेवटचा अंक 6 ठेवावा. नात्यातील वाद कमी होऊ लागतील.
आपल्या मोबाईल नंबरमध्ये कुठेही 6 आकडा असणं म्हणजे तुम्ही तुमच्या कुटुंबाची काळजी घेणारी व्यक्ती आहात, असं मानलं जातं. तुम्ही तुमच्या पालकांसह कुटुंबातील सर्व सदस्यांची काळजी घेता, असा त्याचा अर्थ होतो. तुम्ही कुटुंबातील विशेष माणूस आहात. तुम्ही तुमच्या आनंदाचा त्याग करणारी आणि कुटुंबाला सुखसोयी देणारी व्यक्ती असाल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)