2025 साली मार्च महिन्यात शनी मीन राशीत प्रवेश करेल. पण, तिथं राहु ग्रह आधीच विराजमान आहे. अशा स्थितीत मीन राशीमध्ये राहू आणि शनीचा संयोग होणार आहे, ज्यामुळे विनाशकारी पिशाच योग तयार होत आहे. हा अत्यंत घातक योग मानला जातो. यामुळे वर्ष 2025 मध्ये काही राशीच्या लोकांच्या आयुष्यात अनेक प्रकारच्या अडचणी येऊ शकतात. कोणत्या राशींसाठी शनी आणि राहूच्या संयोगाने बनलेला पिशाच योग धोकादायक ठरू शकतो, पाहुया.
advertisement
द्रिक पंचांगानुसार, शनी 29 मार्च 2025 रोजी रात्री 10:07 वाजता मीन राशीत प्रवेश करेल. तिथे राहु ग्रह आधीच उपस्थित आहे. ज्यावेळी राहू राशी बदललेल तेव्हा पिशाच योग संपेल.
मीन - या राशीच्या चढत्या घरात राहू आणि शनीचा संयोग आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांच्या आयुष्यात काही उलथापालथ होऊ शकते. आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. यासोबतच काही मोठ्या आजाराचेही संकेत आहेत. शारीरिक सोबतच तुम्हाला मानसिक समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते.
मीन - नोकरी-व्यवसायातही थोडे सावध राहावे लागेल. तुमचा एक निर्णय तुमचे आयुष्य उध्वस्त करू शकतो. वरिष्ठ अधिकारी आणि सहकाऱ्यांशी काही मुद्द्यावरून वाद होऊ शकतो. त्यामुळे थोडी काळजी घेण्याची गरज आहे. वैवाहिक जीवनातही तुम्हाला काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
चांगलं जमतं, एकमेकांशी जुळवून घेतात! या जन्मतारखांची जोडी अगदी योग्य ठरते
मकर - या राशीमध्ये तिसऱ्या घरात पिशाच योग तयार होणार आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांनी थोडे सावध राहणे आवश्यक आहे. भाऊ-बहिणीच्या नात्यात दुरावा येऊ शकते. आपल्या कामाचे, समर्पणाचे आणि मेहनतीचे फळ मिळणार नाही. तुम्हाला मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. मित्र, कुटुंब किंवा शेजाऱ्यांशी काही मुद्द्यावरून वाद होऊ शकतो. त्यामुळे थोडे सावध राहण्याची गरज आहे. आरोग्याबाबत थोडे सावध राहा. दम्यासारख्या श्वसनाच्या समस्या उद्भवू शकतात. प्रवासात थोडी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. राहू तुमच्यात गोंधळ निर्माण करू शकतो. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी विचार करा.
कन्या - राहू आणि शनीच्या संयोगामुळे निर्माण झालेला पिशाच योग या राशीच्या सातव्या घरात तयार होणार आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांनी थोडे सावध राहणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक टाळा. संयमाने काम करा, तरच यश मिळेल. वैवाहिक जीवनातही अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. पती-पत्नीमध्ये काही गोष्टींवरून मतभेद होऊ शकतात. यासोबतच कौटुंबिक जीवनात आनंदाची कमतरता भासू शकते. भागीदारीत केलेल्या व्यवसायातही नुकसान होण्याची शक्यता आहे.
साडेसातीमध्येही सुखात राहण्याचे उपाय! शनिदेवाचा पारा या गोष्टींमुळे आपोआप ओसरतो
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)