कोल्हापूर : अंकशास्त्रानुसार अंक हे आपल्या आयुष्यात महत्त्वाचं कार्य बजावत असतात. येणाऱ्या काही दिवसातच 2025 हे नववर्ष सुरू होणार आहे. ज्यांची जन्मतारीख 2, 11, 20, 29 आहे त्यांच्यासाठी येणार 2025 वर्ष कसं जाणार हे आपण पाहुयात. या तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मुलांक किंवा शुभांक हा 2 असतो. 2 मुलांक असणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यात येणाऱ्या नववर्षात काय वाढून ठेवलय याची माहिती ज्योतिषशास्त्री राहुल कदम यांनी दिली आहे.
advertisement
2 मुलांक असणाऱ्या व्यक्तींचा स्वभाव
अंकशास्त्राच्या दृष्टीने 2 या अंकावर चंद्र या ग्रहाचा प्रभाव असून तो या अंकाचा स्वामी ग्रह आहे. ज्योतिष शास्त्रानुसार आणि अंकशास्त्रानुसार चंद्र हा ग्रह मनाचा कारक मानलेला असून या अंकाच्या व्यक्ती या संवेदनशील आणि भावनाशील अशा असतात, असं ज्योतिषशास्त्री राहुल कदम सांगतात.
Astrology: 2025 वर्ष मंगळ ग्रहाचं, प्रचंड उलथापालथ होणार, अडचणी येणार, जरा जपून...
येणार वर्ष कसे जाणार?
येणारे वर्ष हे मंगळाच्या अधिपत्याखाली येणारी असल्याने मंगळाचा स्वभाव हा अति महत्वाकांक्षी धाडसी पुढे पुढे करणारा असा असून तो चंद्राच्या स्वभावाच्या थोडा विपरित असा असल्याने 2 अंकाचा प्रभाव असलेल्या व्यक्तींनी यावर्षी बोलण्यावर थोडे नियंत्रण ठेवावे. तसेच बोलताना विचार करून बोलावे नाहीतर आपल्या बोलण्याचा विपर्यास होऊन वादविवाद होण्याची शक्यता अधिक राहील. या बरोबरच यावर्षी आरोग्याच्या दृष्टीने थोडे काळजी करण्याचे वर्ष असून 2 या अंकाचा 9 हा अंक मित्र अथवा शत्रू नसल्याने आगामी वर्ष हे 2 अंकासाठी फारसे फलदायी ठरेल असे नाही. कोणत्याही गोष्टीसाठी असणारा आत्मविश्वास या वर्षी कमी राहील. त्यामुळे कोणत्याही मोठ्या नियोजनाची जबाबदारी शक्यतो न घेतलेली बरी, असं ज्योतिषशास्त्री राहुल कदम सांगतात.
कोणती उपासना ठरेल फलदायी ?
2 मुलांक आहे त्यांच्यासाठी येणार नववर्ष थोडं संमिश्र स्वरूपात जाणारे जरी असलं तरी त्यांच्यासाठी उपासना फार महत्त्वाची ठरणार आहे. हनुमानाची उपासना करणं उपयुक्त ठरणार आहे. हनुमानाची उपासना करण्यामुळे निश्चितच 2 मुलांक असणाऱ्या व्यक्तींना नक्कीच फायदेशीर ठरेल, असंही ज्योतिषशास्त्री राहुल कदम यांनी सांगितले.
सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.