Pakistan Boycott: क्रिकेट विश्वातून पाकिस्तानला बेदखल करा; भारताविरुद्ध खेळणार नसाल तर..! साधू-संतही भडकले
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Pakistan Boycott: ट्वेंटी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानने भारतासोबत खेळायला नकार दिल्यामुळे क्रिकेट जगतात मोठी खळबळ उडाली आहे. या निर्णयामुळे क्रीडाप्रेमींमध्ये संतापाची लाट असून अयोध्येतील साधू-संतांनीही पाकिस्तानच्या या भूमिकेचा जोरदार निषेध केला आहे.
नवी दिल्ली : क्रिकेट ट्वेंटी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानने भारतासोबत खेळायला नकार दिल्यामुळे क्रिकेट जगतात मोठी खळबळ उडाली आहे. या निर्णयामुळे क्रीडाप्रेमींमध्ये संतापाची लाट असून अयोध्येतील साधू-संतांनीही पाकिस्तानच्या या भूमिकेचा जोरदार निषेध केला आहे. पाकिस्तान भारताला घाबरून पळाला, अशी टीका करत संतांनी आयसीसीकडे (ICC) पाकिस्तानवर कायमची बंदी घालण्याची मागणी केली आहे. या वादावर अयोध्या धाममधील संतांनी तीव्र मते व्यक्त केली आहेत.
पाकिस्तानचा भारतासोबतच्या सामन्यावर बहिष्कार - 15 फेब्रुवारी रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज सामना होणार होता, पण पाकिस्तानने या सामन्यावर बहिष्कार टाकला आहे. त्यांनी स्पष्ट केलंय की, ते वर्ल्ड कपमध्ये खेळतील, पण भारतासमोर मैदानात उतरणार नाहीत. या निर्णयामागे बांगलादेशशी एकजूट दाखवण्याचं कारण पाकिस्तान सरकारकडून देण्यात आलं आहे. मात्र, क्रिकेटच्या मैदानात अशा प्रकारे राजकारण आणल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
advertisement
देवेशाचार्य महाराज म्हणाले?
हनुमानगढीचे देवेशाचार्य महाराज यांनी पाकिस्तानच्या या निर्णयाचा तीव्र शब्दात निषेध केला. त्यांच्या मते, खेळाच्या जगात शत्रूत्वाला किंवा सामना खेळायला नकार देण्याला जागा नसते. खेळ हा नेहमी भाईचारा आणि खिलाडूवृत्तीने खेळला जातो, पण पाकिस्तानने नकार देऊन मोठी चूक केली आहे. खरंतर आयसीसीने आता पाकिस्तानवर आजीवन बंदी घातली पाहिजे आणि त्यांना इतर कोणत्याही देशासोबत खेळू देऊ नये. पाकिस्तानने या निर्णयामुळे आपली दहशतवादी विचारधारा पुन्हा एकदा जगासमोर आणली आहे, असंही ते म्हणाले.
advertisement
मधुसूदन दास महाराज - हनुमानगढीचेच मधुसूदन दास महाराज यांनी यावर टोला लगावत म्हटलं की, पाकिस्तान आधीच घाबरून पळाला ही चांगलीच गोष्ट आहे. युद्धभूमीवर पाकिस्तानची जी अवस्था झाली, तशीच अवस्था आता क्रिकेटच्या मैदानात भारतासमोर होणार होती. भारताचा मुकाबला करणं आपल्याला शक्य नाही हे पाकिस्तानला पक्कं माहीत आहे, म्हणूनच त्यांनी माघार घेतली. पण खेळाच्या मैदानात राजकारण आणणाऱ्या पाकिस्तानला सोडता कामा नये. आयसीसीने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पाकिस्तानच्या टीमवर कायमची बंदी घालण्यावर विचार करावा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 03, 2026 4:21 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Pakistan Boycott: क्रिकेट विश्वातून पाकिस्तानला बेदखल करा; भारताविरुद्ध खेळणार नसाल तर..! साधू-संतही भडकले









