Astrology: आधीच उल्हास त्यात..! अडचणीत असलेल्या 3 राशींना मोठा झटका; अशुभ जडत्व योग अनलकी
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Astrology: आज दिनांक 3 फेब्रुवारी 2026 रोजी बुध ग्रहाचे राशी परिवर्तन होत आहे. बुध मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करेल आणि 11 एप्रिल 206 पर्यंत याच राशीत राहील. कुंभ राशीत राहु आधीपासूनच विराजमान असल्याने बुध आणि राहुची युती होऊन 'जडत्व योग' तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रात हा योग अशुभ आणि नकारात्मक मानला जातो. या योगामुळे तीन राशींच्या अडचणी वाढू शकतात, त्यामुळे 11 एप्रिलपर्यंत त्यांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे.
कर्क राशीच्या व्यक्तींना या काळात भ्रम आणि गोंधळाच्या स्थितीला सामोरे जावे लागू शकते. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना तुम्हाला अडचणी येतील आणि घाईघाईत घेतलेला एखादा चुकीचा निर्णय मोठे नुकसान करू शकतो. बुधाची ही चाल तुमच्यासाठी अडचणीची परिस्थिती निर्माण करेल, ज्यामुळे मानसिक आणि भावनिक संतुलन बिघडू शकते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
मीन - व्यापार किंवा गुंतवणुकीशी संबंधित निर्णय घेताना कमालीची सावधगिरी बाळगा, आर्थिक नुकसानीची दाट शक्यता आहे. प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचलणेच तुमच्या हिताचे ठरेल. यासोबतच आरोग्याशी संबंधित तक्रारी देखील तुम्हाला सतावू शकतात.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)









