advertisement

Malanggad Funicular Railway: मलंगगडावर मोठी घटना, फ्युनिकुलर ट्रॉली अडकली, अनेक भाविक अडकल्याची भीती

Last Updated:

कल्याण येथील मलंगगडावर जाण्यासाठी मागील महिन्यात मोठा गाजावाजा करून देशातील सर्वात मोठ्या आणि लांब पल्ल्याच्या फ्युनिक्युलर ट्रॉली सुरू करण्यात आली.

News18
News18
कल्याण : मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेली कल्याणमधील श्री मलंगगडावरील फ्युनिकुलर ट्रॉलीबद्दल धक्कादायक घटना घडली आहे. मलंगगडावर भाविकांना घेऊन जाताना फ्युनिकुलर ट्रॉलीमध्येच अडकली. भाविक मध्येच अडकल्यामुळे खळबळ उडाली आहे. क्षमतेपेक्षा जास्त भाविक घेऊन गेल्यामुळे फ्युनिकुलर वाटेतच अडकली असल्याचं सांगितलं जात आहे. घटनास्थळी भाविकांना बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.
कल्याण येथील मलंगगडावर जाण्यासाठी मागील महिन्यात मोठा गाजावाजा करून  देशातील सर्वात मोठ्या आणि लांब पल्ल्याच्या फ्युनिक्युलर ट्रॉलीचं लोकार्पण पार पडलं होतं.  भाजप आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते या ट्रॉलीचं लोकार्पण झालं होतं. आज मोठ्या संख्येनं यात्रेसाठी भाविक जमा झाले आहे. पण, अचानक दुपारच्या सुमारास फ्युनिक्युलर ट्रॉलीही वाटेतच बंद पडली. भाविकांनी भरलेली ट्रॉली वाटेतच बंद पडल्यामुळे सर्वत्र गोंधळ उडाला.
advertisement
⁠फ्युनिकुलर ट्रॉलीमध्ये लोकं अडकल्याची भिती वर्तवण्यात येत आहे.  ⁠मलंगगडावर सध्या यात्रा सुरू आहे. त्यामुळे मोठ्या संख्येनं भााविक इथं उपस्थितीत आहे. सोमवारी देखील  मंत्री आणि व्हिआयपी आले असताना फ्युनिकूलर ट्रॉली बंद पडली होती. ⁠यामुळे मोठा अपघात होऊ शकतो अशी भीती वर्तवली जात होती. अखेरीस आज  ⁠क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी संख्या असल्याने ट्रॉली अडकल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
कशी आहे फ्युनिक्युलर ट्रॉली? 
ठाणे जिल्ह्यातील मलंगगड हे हिंदू आणि मुस्लिम भाविकांचे एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगेत वसलेल्या या गडावर जाण्यासाठी आतापर्यंत भाविकांना कठीण अशी दोन तासांची चढण चढावी लागत होती. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांसाठी हा प्रवास अतिशय त्रासदायक ठरत होता. ही अडचण लक्षात घेऊन अंबरनाथचे तत्कालीन आमदार किसन कथोरे यांनी स्वित्झर्लंडच्या धर्तीवर मलंगगडावर फ्युनिक्युलर रेल्वे सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला होता.
advertisement
फ्युनिक्युलर रेल्वे सेवा
भाजपचे आमदार किसन कथोरे यांनी 2004 मध्ये फ्युनिक्युलर ट्रॉलीबदद्ल प्रस्ताव मांडला होता. प्रत्यक्षात या प्रकल्पाच्या कामाला 2012 मध्ये सुरुवात झाली. मात्र विधानसभा क्षेत्राच्या विभाजनानंतर हा प्रकल्प काही काळ रखडला होता. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांच्या प्रयत्नांमुळे नव्याने कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली आणि कामाला गती मिळाली. मागील महिन्यात जानेवारी २०२६ मध्ये फ्युनिक्युलर ट्रॉलीचं लोकार्पण पार पडलं. सार्वजनिक बांधकाम विभागाने सप्तशृंगी वणीगडाच्या धर्तीवर मलंगगड इथं फ्युनिक्युलर रेल्वे प्रकल्प सुरू केला होता.
advertisement
दोन डब्बे आणि १२०० प्रवाशांची क्षमता
मलंगगडावर जाण्यासाठी  फ्युनिक्युलर ट्रॉलीसाठी दोन ट्रॅक तयार करण्यात आले आहेत.  या फ्युनिक्युलर ट्रॉलीमध्ये दोन प्रशस्त डब्बे आहेत. या सेवेच्या माध्यमातून दर तासाला सुमारे 1200 प्रवासी प्रवास करू शकतात.  सुप्रीम सुयोग फ्युनिक्युलर रोपवेज कंपनीकडे फ्युनिक्युलर ट्रॉलीचं व्यवस्थापन आहे. या संपूर्ण व्यवस्थेसाठी सुमारे 70 कर्मचारी तैनात आहेत.
view comments
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Malanggad Funicular Railway: मलंगगडावर मोठी घटना, फ्युनिकुलर ट्रॉली अडकली, अनेक भाविक अडकल्याची भीती
Next Article
advertisement
WhatsAppला कोर्टाचा दणका, नियम पाळता येत नसेल तर भारत सोडा; भर न्यायालयात 'प्रायव्हसी'चा फुगा फुटला, 213 कोटींचा दंड
WhatsAppला कोर्टाचा दणका, नियम पाळता येत नसेल तर भारत सोडा; 213 कोटींचा दंड
  • WhatsAppच्या प्रायव्हसी पॉलिसीवर कोर्टाचा घणाघात

  • आम्हालाच तुमची पॉलिसी समजत नाही, तर गरिबांचं काय?

  • 213 कोटींचा दंड, तरीही डेटा शेअरिंग

View All
advertisement