कोल्हापूर : अंकशास्त्र म्हणजे एखाद्याच्या आयुष्यातील संख्यांचा अभ्यास. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये संख्या खूप महत्त्वाची भूमिका बजावते. हे केवळ एखाद्या व्यक्तीच्या मार्गाला आकार देत नाही तर व्यक्तीला त्याच्या जीवनात येणाऱ्या अनेक समस्यांपासून सुरक्षित राहण्याचा अंदाज देते. अंकशास्त्र वाचनात बराच सखोल गणनेचा समावेश असतो. कोल्हापुरातील अंकज्योतिष अभ्यासक राहुल कदम यांनी मूलांक आणि भाग्यांक म्हणजे काय? आणि ते कसे शोधायचे? याबाबत माहिती दिलीये.
advertisement
मानवी जीवनात अंकांना अनन्य साधारण महत्त्व आहे. मनुष्याच्या जीवनात 1 ते 9 हे अंक आपली एक वेगळी भूमिका बजावतात. अंकशास्त्रानुसार मानवी जीवनातील अंकांची भूमिका बघण्यासाठी मूलांक म्हणजेच शुभांक व भाग्यांक यांचा विचार केला जातो. कोणत्याही व्यक्तीचा मुलांक किंवा भाग्यांक काढण्याकरिता त्याच्या जन्मतारखेचा प्रामुख्याने विचार केला जातो.
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळला पंचगंगा घाट, 'त्रिपुरारी'ला डोळ्याचं पारणं फेडणारा दीपोत्सव
मूलांक कसा काढायचा?
मुलांक काढण्यासाठी व्यक्तीच्या जन्मतारखेतील फक्त तारीख विचारात घेतली जाते. उदाहरणार्थ ज्या व्यक्तीची जन्मतारीख 26 आहे त्याचा शुभांक हा 2+6=8 इतका येईल व ज्या व्यक्तींची जन्मतारीख एक अंकी आहे त्यांचा शुभांक मात्र ती तारीख येईल. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख 1 ते 9 या अंकांमध्ये असेल तर तोच अंक त्याचा शुभांक मानला जाईल. जन्मतारीख 5 असेल तर त्या व्यक्तीचा शुभांक 5 हाच असेल, असं अंक ज्योतिष तज्ज्ञ सांगतात.
Numerology: या जन्मतारखेच्या व्यक्ती असतात सौंदर्याच्या चाहत्या, स्वत:ही दिसतात अत्यंत देखण्या!
भाग्यांक कसा शोधायचा?
आता भाग्यांक यालाच लाइफ पाथ नंबर असे देखील म्हटले जाते. तो काढण्याकरिता व्यक्तीच्या संपूर्ण जन्म तारखेची बेरीज करून त्याचा एकांक केला जातो. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख जर 26/03/1981 असेल तर 2+6+3+1+9+8+1 = 30. आता
3+0 = 3. या पद्धतीने व्यक्तीच्या पूर्ण जन्म तारखेची बेरीज केली असता त्या बेरजेचा एक अंक 3 हा येतो म्हणजेच त्या व्यक्तीचा भाग्यांक 3 हा आहे.
अशा पद्धतीने कोणत्याही व्यक्तीची शुभांक किंवा भाग्यांक शोधायचा असेल तर त्या व्यक्तीची जन्मतारीख माहिती असणे गरजेचे आहे. जन्म तारखेच्या आधारे आपण व्यक्तीचा शुभांक व भाग्यांक शोधू शकतो. आता त्या व्यक्तीच्या शुभांक किंवा भाग्यांकाचा त्याच्या जीवनावरती होणारा परिणाम कसा असेल? ते त्या अंकाच्या गुणधर्मावरती आधारित असते.