मूलांक 8 - तारीख 8, 17 आणि 26
ज्यांचा मूलांक 8 आहे म्हणजेच ज्यांचा जन्म 8, 17 किंवा 26 तारखेला झाला आहे, ते लोक अत्यंत गंभीर आणि संयमी स्वभावाचे असतात. या लोकांवर शनीचा प्रभाव असतो. हे लोक सहजासहजी कोणाशी मैत्री करत नाहीत, पण एकदा का कोणाला मित्र मानले की, त्याच्यासाठी ते शेवटपर्यंत उभे राहतात. हे लोक तुमची गुपिते काळजाच्या कोपऱ्यात दडवून ठेवतात आणि ती कधीही उघड करत नाहीत.
advertisement
मूलांक 2 - तारीख 2, 11, 20 आणि 29
मूलांक 2 चा स्वामी चंद्र आहे. या तारखांना जन्मलेले लोक अत्यंत भावूक आणि संवेदनशील असतात. ते समोरच्या व्यक्तीच्या भावनांची कदर करतात. जर तुम्ही त्यांना एखादी खाजगी गोष्ट सांगितली, तर त्यांना त्या गोष्टीचे गांभीर्य समजते. हे लोक आपल्या मित्राला धोका देण्याचा विचार स्वप्नातही करू शकत नाहीत. या मूलांकाचे लोक एखादे सिक्रेट खूप जपून ठेवतात. या मूलांकाच्या लोकांवर तुम्ही डोळे बंद करून विश्वास ठेवू शकता.
मूलांक 7 - तारीख 7, 16 आणि 25
मूलांक 7 चे लोक थोडे रहस्यमयी स्वभावाचे असतात. केतूचा प्रभाव असल्याने हे लोक अध्यात्मिक आणि खोल विचार करणारे असतात. त्यांना इतरांच्या आयुष्यात डोकावणे आवडत नाही आणि इतरांनी त्यांच्याकडे सोपवलेला विश्वास ते जीवापाड जपतात. त्यांच्याकडे तुम्ही कोणतीही गोष्ट सांगितली तरी ती त्यांच्यासोबतच कायमची सुरक्षित राहते.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
