अंकशास्त्राचे जाणकार एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा प्राथमिक अंदाज सहजपणे लावू शकतात. अंकशास्त्रात एकूण 9 मूलांक असतात. प्रत्येक मूलांकाचा एक स्वामी (ग्रह) असतो. 9 मूलांकांमध्ये एक मूलांक असा आहे की जो खूप खास मानला जातो. हा मूलांक असलेल्या व्यक्ती जीवनात खूप पैसा, प्रॉपर्टी कमावतात. ऐषारामात जीवन जगतात. ते कमी वयात श्रीमंत बनतात.
advertisement
या मूलांकाच्या व्यक्तींचा स्वभाव देखील वैशिष्ट्यपूर्ण असतो. मित्र जोडण्याकडे त्यांचा कल असतो. त्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात घवघवीत यश मिळवू शकतात. असा हा खास मूलांक कोणता, त्याची आणखी काय वैशिष्ट्ये असतात ते जाणून घेऊया.
अंकशास्त्रात व्यक्तीच्या जन्म दिवसावरून त्याच्या स्वभाव, व्यक्तिमत्त्व आणि भविष्यातील घटनांचा वेध घेता येतो. अंकशास्त्रात 6 हा मूलांक खूप खास मानला जातो. ज्या व्यक्तींचा जन्म कोणत्याही महिन्यातील 6,15 किंवा 24 तारखेला झालेला असतो, त्यांचा मूलांक 6 असतो.
ताण-तणाव, भांडणं! घरात अशा ठिकाणी माचिस चुकूनही ठेवू नये; नकारात्मकता वाढते
या मूलांकाच्या व्यक्ती जीवनात भरपूर नाव कमावतात. त्यांना प्रसिद्धी देखील अगदी सहज मिळत जाते. कमी वयात श्रीमंत बनतात. 6 या मूलांकाचा स्वामी ग्रह शुक्र आहे. शुक्राच्या कृपेमुळं या मूलांकाच्या व्यक्तींना जीवनात प्रत्येक क्षेत्रात यश मिळते. त्यांना प्रवासाची विशेष आवड असते. ते आरामदायी आयुष्य जगतात. त्यांना जीवनात अनेक अलिशान सुविधा ही मिळतात.
मूलांक 6 असलेल्या व्यक्तींचे वर्तन खूप चांगले असते. त्यामुळे लोक त्यांच्याकडे सहज आकर्षित होतात. त्यांना भरपूर मित्र असतात आणि ते मैत्री निभावण्यात अव्वल असतात. कितीही वय वाढले तरी या व्यक्ती मनाने कायम तरूण असतात. या व्यक्तींचा स्वभाव शांत असल्याने कितीही कठीण प्रसंग आला तरी ते त्याचा ताण घेत नाहीत.
या मूलांकाच्या व्यक्तींनी विनासंकोच खर्च करण्याची सवय असते. त्यांना कंजुसपणा अजिबात आवडत नाही. या व्यक्ती जीवनात भरपूर पैसा कमावतात आणि खर्च करताना मागेपुढे पाहत नाही. काही वेळा या मूलांकाच्या व्यक्तींना दारुचे व्यसन लागते. पण यामुळे पुढे जीवनात अडचणींचा सामना करावा लागतो.
अडचणीत सर्वांनी पाठ फिरवली! या राशींचे आता पालटणार नशीब; सगळे हिशोब चुकते
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)