अयोध्या, 11 सप्टेंबर : सनातन हिंदू धर्मात गणेश उत्सव अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. हिंदू पंचांगानुसार, भद्रापद महिन्याच्या शुक्ल पक्षच्या चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी हा सण साजरा केला जातो. गणेश चतुर्थीपासून आगामी 10 दिवस गणपती बाप्पाची स्थापना केली जाते आणि विधीपूर्वक त्यांची पूजा केली जाते.
ज्योतिष शास्त्रानुसार यावर्षी गणेश चतुर्थीला तब्बल 300 वर्षानंतर एक अद्भुत योगायोग घडत आहे. यावेळी गणेश चतुर्थीला ब्रह्मयोग आणि शुक्ल योग असे शुभ योग तयार होत आहेत. म्हणून या अशा परिस्थितीत गणेश चतुर्थीचा दिवस तीन राशीच्या लोकांसाठी खूप भाग्यवान ठरणार आहे.
advertisement
300 वर्षांनी असा दुर्लभ योग -
अयोध्येतील प्रसिद्ध ज्योतिषी पंडित कल्की राम सांगतात की, गणेश चतुर्थीचा सण सनातन धर्मात खूप महत्त्वाचा आहे. यंदा हा सण 18 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. 10 दिवस साजरा होणारा हा सण ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार अतिशय शुभ मानला जातो. ज्योतिष शास्त्रानुसार, गणेश चर्तुर्थीला यावर्षी तब्बल 300 वर्षांनी एक अद्भुत असा योगायोग तयार होत आहे, ज्यामुळे काही राशीतील लोक हे मालामाल होऊ शकतात. यामध्ये मेष, मिथुन आणि मकर राशीच्या लोकांचा फायदा होऊ शकतो.
या राशीतील लोकांवर बरसणार गणपती बाप्पाची कृपा
मेष राशि : गणेश चतुर्थीच्या दिवशी मेष राशीच्या लोकांच्या आयुष्यात अनेक प्रकारचे आनंद येतील. चांगली बातमी मिळू शकते. मालमत्तेत गुंतवणुकीसाठी हा काळ अतिशय अनुकूल राहील, व्यवसाय वाढेल, प्रलंबित कामे पूर्ण होतील.
मिथुन राशि : गणेश चतुर्थी मिथुन राशीच्या लोकांसाठीही शुभ असणार आहे. या राशीतील लोकांचे नशीब बदलू शकते. तुम्ही अमाप संपत्ती मिळवू शकता. नोकरी आणि व्यवसायात वाढ होईल. वैवाहिक जीवनात आनंद येईल.
मकर राशि : गणेश चतुर्थीचा दिवस मकर राशीच्या लोकांसाठी खूप शुभ असणार आहे. या राशीतील लोकांचा आदर आणि प्रतिष्ठा वाढेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील, व्यवसायाशी संबंधित समस्या दूर होतील, दीर्घकाळ प्रलंबित कामे पूर्ण होतील.
(NOTE: या बातमीत दिलेली सर्व माहिती आणि तथ्य ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे. NEWS18 LOCAL कोणत्याही तथ्याची पुष्टी करत नाही.)