अयोध्या : वैदिक ज्योतिष शास्त्रात शनि देवाला न्याय देवता म्हटले जाते. शनिदेवाची कृपा ज्या व्यक्तीवर पडते, त्या व्यक्तीला ते राजा बनवतात. ग्रहांमध्ये सर्वात रागीट ग्रह शनिदेवाला मानले जाते. तसेच व्यक्तीच्या वाईट कर्मांची शिक्षाही शनिदेव देतात, असे सांगितले जाते.
शनि देव सर्व ग्रहांमध्ये मंद गतीने चालणारा ग्रह आहे. तसेच याचा प्रभावही शुभ आणि अशुभ कोणत्याही राशीवर अधिक दिवस राहतो. त्यामुळे शनिची वक्रदृष्टी ज्या राशीच्या व्यक्तीवर पडते, त्या व्यक्तीला अनेक दु:खाचा सामना करावा लागतो.
advertisement
अयोध्येचा ज्योतिषी पंडित कल्कि राम यांनी याबाबत माहिती दिली. ज्योतिषीय गणनेनुसार, शनि देवाला विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते. शनिदेव जेव्हा प्रसन्न होतात तेव्हा जातकाला गरीबापासून श्रीमंत बनवतात. मात्र, जर क्रोधित झाले तर श्रीमंतापासून गरीब बनवतात. म्हणजे शनिदेव कर्मांनुसार फळे देतात.
मेहनतीचं फळ! फक्त 2 लाखांत सुरू केला व्यवसाय, आज वर्षाला तब्बल इतकी कोटींची कमाई
शनिदेवाला काही राशी प्रिय असल्याचे सांगितले जाते. या राशीच्या लोकांवर शनिदेवाची विशेष कृपा असते. या लोकांच्या आयुष्यात सदैव सुख आणि आनंद असतो. तसेच या लोकांच्या आयुष्यात आर्थिकदृष्ट्या सक्षम असतात.
मुलांमध्ये दिसत असतील ‘ही’ लक्षणं तर व्हा सावध, असू शकतो या नावाचा गंभीर आजार VIDEO
या राशी शनिदेवाला प्रिय -
शनि देवाला सर्वात प्रिय राशी तूळ राशी, मकर राशी आणि कुंभ राशी मानली जाते. शनिची दृष्टि जेव्हा आपली राशी अथवा उच्च राशीमध्ये असते, तेव्हा व्यक्तीला लाभ होतो. शनिदेवाची वक्रदृष्टी जेव्हा मेष, कर्क किंवा सिंह मध्ये असेल तर लाभच लाभ करतात. याशिवाय शनिवर जेव्हा गुरूची दृष्टी असते, तेव्हा याचासुद्धा फायदा होतो. तर शनि जेव्हा कुंभ राशीत असतात, तेव्हाही ते शुभ फळ देतात.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती राशिचक्र, धर्म आणि शास्त्राच्या आधारे ज्योतिषी आणि आचार्यांशी चर्चा केल्यानंतर लिहिली आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. तसेच याबाबत लोकल18 कोणताही दावा करत नाही.
