मेहनतीचं फळ! फक्त 2 लाखांत सुरू केला व्यवसाय, आज वर्षाला तब्बल इतकी कोटींची कमाई

Last Updated:

लीड्स कनेक्टचे चेअरमन मॅनेजिंग डायरेक्टर नवनीत रविकर एक तरुण आहे. तसेच ही त्यांची स्वत:ची कंपनी आहे.

नवनीत रविकर
नवनीत रविकर
नोएडा : यश त्यांनाच मिळते, जे न खचता, न थकता कठोर परिश्रम करतात. हेच एका व्यक्तीने सिद्ध करुन दाखवले आहे. फक्त 2 लाख रुपयांपासून सुरू केलेला व्यवसाय आज कोट्यवधी रुपयांच्या घरात पोहोचला आहे. आज जाणून घेऊयात या व्यक्तीच्या यशाची ही प्रेरणादायी कहाणी.
लीड्स कनेक्ट असे या कंपनीचे नाव आहे. खराब पिके, कमी उत्पादन, मातीची गुणवत्ता, पीक विमा यासह शेतापासून ते किचनपर्यंत कन्सल्टन्सीचे काम ही कंपनी करते. नवनीत रविकर हे या कंपनीचे डायरेक्टर आहेत. त्यांनी आपले शिक्षण रांची येथून पूर्ण केले. त्यानंतर अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी ते बंगळुरू येथे गेले. ते शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी हैदराबाद येथून आपले एमबीएचे शिक्षण पूर्ण केले.
advertisement
या बाबाचा विषयच वेगळा! महागडी गाडी नव्हे तर सोबत ठेवतात ही वस्तू... तुम्हीही व्हाल चकित
लीड्स कनेक्टचे चेअरमन मॅनेजिंग डायरेक्टर नवनीत रविकर एक तरुण आहे. तसेच ही त्यांची स्वत:ची कंपनी आहे. त्यांनी त्यांची पत्नी रिचा खंडेवाल यांच्यासोबत मिळून 2012 मध्ये लीड्स इंश्योरेंस ब्रोकर नावाने एक कंपनी सुरू केली होती. यासोबतच ते कन्सल्टन्सीचेही काम करत होते. त्यामुळे या अनुभवाच्या जोरावर त्यांनी रिस्क कन्सल्टन्सी व्यवस्थापन क्षेत्रात काम करण्याची योजना तयार केली.
advertisement
अशाप्रकारे सुचली कल्पना -
नवनीत रविकर यांनी सांगितले की, सुरुवातीपासून त्यांचे व्यवसाय करण्याचे स्वप्न होते आणि अनेक वर्षांच्या मेहनतीने आज त्यांची कंपनीचा टर्नओव्हर हा 22 कोटी रुपये इतका आहे. दरवर्षी 5 पट पुढे जायचा प्रयत्न असतो. डायरेक्ट आणि इंडायरेक्ट सध्या 15 हजार शेतकरी आमच्यासोबत जोडले गेले आहेत. तसेच पुढच्या वर्षी ही संख्या 50 हजार पर्यंत जाईल.
advertisement
यावेळी अक्षय तृतीयेला दुर्मिळ योग, या 3 राशीच्या लोकांचं नशिब उजळणार, तुमची रास यात आहे का?
आज ते त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून शेकडो जणांना नोकरी देत आहेत. शेतकऱ्याच्या प्रत्येक समस्येचे समाधान त्यांची कंपनी करते. पिकांच्या पेरणीपासून किचनपर्यंत मार्गदर्शन करण्याचे काम ही कंपनी करते. तसेच शेतकऱ्यांना ऑनलाइन आणि ऑफलाइन सर्व प्रकारे मदत करते.
मराठी बातम्या/मनी/
मेहनतीचं फळ! फक्त 2 लाखांत सुरू केला व्यवसाय, आज वर्षाला तब्बल इतकी कोटींची कमाई
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement