अयोध्या - वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार एक ठराविक कालावधी पूर्ण केल्यावर सर्व ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतील. याचा प्रभाव सर्व 12 राशींवर पडतो. ज्योतिष शास्त्रात शनि ग्रहाला खूप महत्त्वाचा ग्रह मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, शनि देव जेव्हा एखाद्यावर प्रसन्न होतात, तेव्हा त्याचे आयुष्य समृद्ध होते.
ज्योतिष गणनेनुसार, गेल्या 15 नोव्हेंबरला शनि ग्रहाने वक्री अवस्थेतून मार्गी अवस्थेत प्रवेश केला आहे. याचा प्रभाव सर्व 12 राशींवर पडणार आहे. मात्र, काही राशी अशा आहेत, ज्यावर शनिची विशेष दृष्टी राहील. त्यामुळे त्या राशी कोणत्या आहेत, हे जाणून घेऊयात.
advertisement
अयोध्येतील ज्योतिषी पंडित कल्कि राम यांनी याबाबत माहिती दिली. ज्योतिष गणनेनुसार, शनि ग्रहाने 15 नोव्हेंबरला कुंभ राशीत मार्गी झाले आहेत. 29 मार्च 2025 पर्यंत ते आता कुंभ राशीतच राहतील. याचा प्रभाव हा मेष, कन्या आणि मकर राशीच्या जातकावर अत्यंत सकारात्मक होणार आहे. या 3 राशीच्या लोकांचे नशीब पालटू शकते.
लग्न जुळत नाहीये म्हणून चिंता नको, हा एक सोपा उपाय अन् घरात वाजेल शहनाई!
मकर राशी : मकर राशीच्या जातकांना थांबलेले पैसे परत मिळतील. परिक्षेपासून ते परदेशापर्यंत जाण्याची योजना यशस्वी होईल. विवाहातील अडचणी दूर होतील आणि व्यवसाय वाढेल.
कन्या राशी : कन्या राशीच्या जातकांचा समाजात मान सन्मान वाढेल. या दरम्यान, शनिच्या कृपेने करिअरमध्ये यश मिळेल. नोकरी मिळेल. व्यापार वाढेल. लक्ष्मी मातेच्या कृपेने धनलाभाचाही योग मिळेल.
मेष राशी : मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप चांगला राहील. अचानक धनलाभ होईल. आत्मविश्वास वाढेल. जीवनात बदल होतील. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत चांगले संबंध निर्माण होतील.
सूचना : ही माहिती राशिचक्र, धर्म आणि शास्त्राच्या आधारे ज्योतिषी आणि आचार्यांशी केलेल्या संवादावर आधारित आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. कोणताही वैयक्तिक सल्ला नाही. याबाबत लोकल-18 कोणताही दावा करत नाही.