TRENDING:

APMC Market: केळी दर घसरलेलेच, लिंबू आणि कांद्याला काय मिळाला भाव, एका क्लिकवर चेक करा

Last Updated:

शुक्रवार रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये कांदा, द्राक्ष, केळी आणि लिंबाची मोठ्या प्रमाणात आवक झाली. कोणत्या मार्केटमध्ये या शेतमालाला काय भाव मिळाला पाहुयात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सांगली: राज्यातील मार्केटमध्ये आज शेतमालाच्या भावामध्ये चढ-उतार पहायला मिळाले. शुक्रवार रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये कांदा, द्राक्ष, केळी आणि लिंबाची मोठ्या प्रमाणात आवक झाली. कोणत्या मार्केटमध्ये या शेतमालाला काय भाव मिळाला पाहुयात.
advertisement

कांद्याची आवक

राज्याच्या मार्केटमध्ये 2 लाख 59 हजार 729 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी 1 लाख 10 हजार 964 क्विंटल सर्वाधिक आवक नाशिक बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार 339 ते 1164 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला. तसेच नागपूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 28 क्विंटल कांद्यास सर्वसाधारण 2290 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.

एक एकरमध्ये केली लिंबाची लागवड, 26 वर्षांनंतरही होतोय फायदा, 80 लाख निव्वळ नफा

advertisement

लिंबूची आवक

राज्याच्या मार्केटमध्ये आज 922 क्विंटल लिंबूची आवक राहिली. यापैकी मुंबई बाजारात आवक झालेल्या 459 क्विंटल लिंबूस 2000 ते 3000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव सर्वात कमी मिळाला. तसेच अहिल्यानगर मार्केटमध्ये आवक झालेल्या 18 क्विंटल लिंबूस 10000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वाधिक सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.

द्राक्ष आवक

राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 1486 क्विंटल द्राक्षाची आवक झाली. यापैकी मुंबई बाजारात 593 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 8000 ते 12000 रुपये दरम्यान सर्वाधिक बाजारभाव मिळाला.

advertisement

केळीची आवक

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
केळी दर घसरलेलेच, लिंबू आणि कांद्याला काय मिळाला भाव, एका क्लिकवर चेक करा
सर्व पहा

राज्याच्या मार्केटमध्ये आज केवळ 506 क्विंटल केळीची आवक झाली. यापैकी नाशिक बाजारात आवक झालेल्या 440 क्विंटल केळीस प्रतीनुसार 800 ते 1800 रुपये दरम्यान बाजारभाव मिळाला.

मराठी बातम्या/कृषी/
APMC Market: केळी दर घसरलेलेच, लिंबू आणि कांद्याला काय मिळाला भाव, एका क्लिकवर चेक करा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल