मुंबई : ज्योतिषशास्त्रात शनीदेवाला कर्मफळदाता आणि न्यायाचा देव मानले जाते. व्यक्तीने केलेल्या कर्मानुसार फळ देणे, हा शनीचा मुख्य स्वभाव आहे. सध्या शनी मीन राशीत स्थित असून, त्यामुळे काही राशींवर साडेसातीचा तर काहींवर ढैय्याचा प्रभाव सुरू आहे. 2026 हे वर्ष शनीच्या दृष्टीने विशेष ठरणार आहे, कारण या काळात शनी वक्री होणार, पुन्हा मार्गी होणार आणि शनीचा उदयही होणार आहे. या सर्व ग्रहस्थितींचा थेट परिणाम काही राशींच्या जीवनावर जाणवणार आहे.
advertisement
ज्योतिषांच्या मते, 2026 मध्ये सिंह आणि धनु या दोन राशींवर शनिची ढैय्या प्रभावी राहणार आहे. ढैय्या म्हणजे अडीच वर्षांचा काळ, जो अनेकदा मानसिक ताण, विलंब, अडथळे आणि जबाबदाऱ्यांची परीक्षा घेणारा ठरतो. त्यामुळे नवीन वर्ष या दोन राशींसाठी आव्हानांनी भरलेले असण्याची शक्यता आहे. मात्र संयम, शिस्त आणि योग्य निर्णय घेतल्यास या काळातूनही सकारात्मक मार्ग काढता येऊ शकतो.
सिंह रास
2026 मध्ये सिंह राशीच्या लोकांवर शनिची ढैय्या सुरू राहणार आहे. त्यामुळे या राशीतील व्यक्तींना प्रत्येक पाऊल जपून टाकावे लागेल. करिअरच्या बाबतीत पाहिले असता, कामाचा ताण वाढेल आणि जबाबदाऱ्या अधिक येतील. मेहनत असूनही अपेक्षित फळ मिळण्यास उशीर होऊ शकतो. काहींचे प्रमोशन रखडण्याची शक्यता आहे, तर काहींची महत्त्वाची कामे वेळेवर पूर्ण होणार नाहीत.
आर्थिक बाबतीत अचानक खर्च वाढू शकतो. उत्पन्न आणि खर्च यामध्ये ताळमेळ राखणे कठीण जाईल. गुंतवणूक करताना फार सावध राहणे गरजेचे आहे. कोणत्याही मोठ्या आर्थिक निर्णयाआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. आरोग्याच्या दृष्टीने थकवा, पाठीचा किंवा सांध्यांचा त्रास जाणवू शकतो. मानसिक अस्वस्थता आणि गैरसमज यामुळे नातेसंबंधांमध्येही तणाव निर्माण होऊ शकतो. अशा वेळी शांत राहणे आणि संवाद साधणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल.
धनु रास
धनु राशीच्या लोकांसाठी शनिची ढैय्या 2026 मध्ये अधिक कसोटी पाहणारी ठरू शकते. या काळात निर्णय घेण्यात संभ्रम निर्माण होऊ शकतो. आत्मविश्वास कमी झाल्यासारखा वाटेल आणि कामात अपेक्षित शिस्त राहणार नाही. हातात घेतलेली कामे वेळेत पूर्ण न होण्यामुळे वरिष्ठ किंवा सहकाऱ्यांकडून नाराजी संभवते.
या काळात कोणताही मोठा निर्णय घेताना घाई टाळावी. कुटुंबातील अनुभवी व्यक्ती किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणे हितावह ठरेल. आर्थिक स्थितीत चढ-उतार जाणवतील. अचानक खर्च किंवा उत्पन्नात विलंब होऊ शकतो. त्यामुळे बचतीकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे.
(सदर बातमी फक्त माहिती करिता न्यूज 18 मराठी कुठलाही दावा करत नाही)
