पंढरपूर तालुक्यातील कोरटी गावात राहणारे शेतकरी प्रवीण वाघमोडे यांनी एका एकरामध्ये डाळिंबाची लागवड केली. डाळिंबाची लागवड करत असताना लहानसा प्रयोग म्हणून त्यांनी अर्धा एकरमध्ये आंतरपीक मधून शकिरा या हिरवी मिरचीच्या 2 हजार रोपांची लागवड केली आहे. आंतरपीक म्हणून हिरवी मिरचीची लागवड करत असताना त्यामधील अंतर दीड फुटाचे ठेवून लागवड करण्यात आली आहे. साधारणतः पावणे महिन्यापासून मिरची येण्यास सुरुवात झाली. सध्या हिरव्या मिरचीला बाजारात 35 ते 40 रुपये किलोने दर मिळत आहे. तर पंढरपूर येथील बाजारात या मिरचीची विक्री शेतकरी प्रवीण वाघमोडे करत आहे.
advertisement
डाळिंबाची रोपे वाढत असताना त्यामध्ये आंतरपीक म्हणून एक प्रयोग करावा म्हणून प्रवीण यांनी हिरवी मिरचीची लागवड केली आहे. तसेच या मिरचीच्या रोपांवर बोकडा नावाचा रोग पडतो. थ्रिप्सचा प्रादुर्भाव जास्त झाला तर मिरचीच्या झाडांचे पान चुरडा मुरड्याहून गळून पडतात. त्यामुळे मिरचीचा प्लॉट लवकर संपू शकतो. दर पाच दिवसाला या मिरचीच्या प्लॉटवर प्रवीण फवारणी करत आहे.
अर्ध्या एकरात लावलेल्या या मिरचीच्या तोड्यातून 70 किलो हिरवी मिरची विक्रीसाठी निघते. आतापर्यंत मिरचीचे सहा तोडे झाले असून खर्च वजा करून 35 हजार रुपयांचा नफा मिळाला असून हा मिरचीचा प्लॉट आणखीन तीन ते चार महिने चालणार असून यातून साधारणतः एक ते दीड लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार असल्याची माहिती प्रयोगशील शेतकरी प्रवीण वाघमोडे यांनी दिली आहे.





