advertisement

Success Story : शेतकऱ्यानं धाडस दाखवलं, केली बोरांची शेती, वर्षाला 3 लाखांचं उत्पन्न

Last Updated:

शेतकरी भारत शिंदे यांनी उमरान आणि चमेली या दोन्ही बोरांची मिक्स शेती केली आहे. 5 वर्षांपूर्वी लागवडीसाठी पन्नास हजार रुपये खर्च आला असून दर वर्षाला दोन ते अडीच लाखांचे उत्पन्न मिळत आहे.

+
News18

News18

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात विविध बोरांची शेती पाहायला मिळत आहे. अशीच शेती मोहोळ तालुक्यातील पेनूर गावात केली आहे. शेतकरी भारत शिंदे यांनी उमरान आणि चमेली या दोन्ही बोरांची मिक्स शेती केली आहे. 5 वर्षांपूर्वी लागवडीसाठी 50 हजार रुपये खर्च आला असून दर वर्षाला अडीच ते तीन लाखांचे उत्पन्न मिळत आहे. या संदर्भात अधिक माहिती शेतकरी भारत शिंदे यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.
पेनूर गावात राहणारे शेतकरी भारत शिंदे यांनी 5 वर्षांपूर्वी उमरान आणि चमेली या दोन्ही बोरांच्या झाडांची मिक्स लागवड केली आहे. अर्ध्या एकरामध्ये जवळपास 200 पेक्षा अधिक रोपांची लागवड केली आहे. लागवडीसाठी पाच वर्षांपूर्वी भारत शिंदे यांना 50 हजार रुपयांपर्यंत खर्च आला होता. लागवडीच्या पहिल्या वर्षी बोरांपासून 1 लाखांचे उत्पन्न मिळाले होते. तर शिंदे यांनी बोरांच्या झाडांची व्यवस्थित छाटणी केली असून उमरान आणि चमेली या बोरांच्या झाडांपासून दरवर्षी अडीच ते तीन लाखांचे उत्पन्न मिळत आहे.
advertisement
बोरांच्या झाडांवर भुरी हा रोग होऊ नये याची विशेष काळजी भरत शिंदे घेत असून वेळोवेळी त्यावर फवारणी करत आहेत. बोरांची तोडणी करून विक्रीसाठी सोलापुरातील श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी पाठवले जात आहे. बाजारामध्ये सध्या उमरान चमेली बोरांना 25 ते 30 रुपये प्रति किलो दर मिळत आहे.
advertisement
मधल्या काळात पुणे येथील बाजारात या बोरांना 60 ते 70 रुपये प्रति किलो भाव मिळाला होता. द्राक्षाची शेती किंवा इतर पिकांची शेती करण्यापेक्षा बोरांची शेती परवडत असून पहिल्याच वर्षी लागवडीचा खर्च वजा करून दरवर्षी अडीच ते तीन लाखांचा नफा शेतकरी भरत शिंदे यांना मिळत असून पाच वर्षांमध्ये दहा लाखांचा नफा या बोराच्या बागेपासून भरत शिंदे यांना मिळाला आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
Success Story : शेतकऱ्यानं धाडस दाखवलं, केली बोरांची शेती, वर्षाला 3 लाखांचं उत्पन्न
Next Article
advertisement
Budget Stocks: बजेटपूर्वी मोठा ट्विस्ट, शेअर मार्केटमध्ये खळबळ; कोणाला फायदा होणार हे आधीच ठरले? 'सिक्रेट लिस्ट'ने वाढवलं टेन्शन
बजेटपूर्वी मोठा ट्विस्ट, शेअर मार्केटमध्ये खळबळ; कोणाला फायदा होणार हे आधीच ठरले
  • उद्या रविवार पण सुट्टी नाही

  • शेअर्सची सिक्रिट लिस्ट आली समोर

  • उद्यासाठी पैसे आजच तयार ठेवा!

View All
advertisement