Success Story : इंजिनिअरिंगच्या नोकरीपेक्षा बिझनेस भारी, चंद्रकांतने शेळ्या पाळून 8 महिन्यात कमावले 5 लाख!
- Reported by:Patel Irfan Hassan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
नोकरीच्या मागे न धावता त्यांनी बंदिस्त शेळीपालन करायचा निर्णय घेतला. बंदिस्त शेळीपालन करत असताना आलेल्या अडचणींवर मात करत आज चंद्रकांत शेवाळे हे आठ महिन्याला आठ ते नऊ लाख रुपयांची उलाढाल करत आहेत.
सोलापूर : अनेक तरुण उच्चशिक्षण घेऊन व्यवसायाकडे वळत आहेत. पंढरपूर तालुक्यातील पळशी गावात राहणाऱ्या चंद्रकांत शेवाळे या तरुणाचं शिक्षण टेक्सटाइल इंजिनिअरिंग झाले आहे. नोकरीच्या मागे न धावता त्यांनी बंदिस्त शेळीपालन करायचा निर्णय घेतला. बंदिस्त शेळीपालन करत असताना आलेल्या अडचणींवर मात करत आज चंद्रकांत शेवाळे हे आठ महिन्याला आठ ते नऊ लाख रुपयांची उलाढाल करत आहेत. पाहुयात यशस्वी बंदिस्त शेळी पालन करणाऱ्या या तरुणाची यशोगाथा.
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील पळशी गावात रहिवासी असलेले चंद्रकांत शेवाळे, वय 27, या तरुणाचे शिक्षण टेक्स्टाईल इंजिनिअरिंगपर्यंत झाले आहे. चंद्रकांत यांनी नोकरी न करता स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला चंद्रकांत यांनी पोल्ट्री व्यवसाय सुरू केला, पण कोरोना काळात पसरलेल्या चिकन खाल्ल्याने कोरोना होत आहे या अफवांमुळे पोल्ट्री व्यवसायात चंद्रकांत यांचं नुकसान झालं. त्यामुळे चंद्रकांत यांनी पोल्ट्री व्यवसाय बंद केला.
advertisement
काही दिवस विचार केला की असा कोणता व्यवसाय आहे, यामध्ये आपण स्वतः त्याचा दर निश्चित करू शकतो. हा अभ्यास करून त्यांनी शेवटी बंदिस्त शेळी पालन करायचा निर्णय घेतला. सुरुवातीला उस्मानाबादी शेळ्या आणि बीटल जातीच्या 5 ते 8 शेळ्या आणून चंद्रकांत यांनी या व्यवसायाला सुरुवात केली. आज चंद्रकांत यांच्याकडे बीटल जातीच्या 20 शेळ्या व 35 लहान शेळ्यांची पिल्ले असून, ब्रेडिंगसाठी दोन बोकड आहेत.
advertisement
सध्या चंद्रकांत हे क्वांटिटी वाढवण्याऐवजी क्वालिटीवर काम करत आहेत. सर्वसाधारण एका शेळीला 2 पिल्ले होतात, आठ महिन्यांचा एक वेत असतो, एका पिलाची किंमत साधारणतः 20 हजार रुपये इतकी असते. दोन शेळ्यांच्या पिल्लांची किंमत 40 हजार रुपये इतकी होते. 20 शेळ्यांमागे 35 ते 40 शेळ्यांची पिल्ले होतात, तर या शेळ्यांच्या पिल्लांच्या विक्रीतून जवळपास आठ लाख रुपयांची उलाढाल होते. सर्व खर्च वजा करून 5 लाख रुपये या बंदिस्त शेळीपालनातून मिळत असल्याची माहिती उच्चशिक्षित तरुण चंद्रकांत शेवाळे यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Dec 13, 2025 6:46 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Success Story : इंजिनिअरिंगच्या नोकरीपेक्षा बिझनेस भारी, चंद्रकांतने शेळ्या पाळून 8 महिन्यात कमावले 5 लाख!








