advertisement

'तू आमच्या कामाचा नाहीस', तोंडावर नकार ऐकल्यानंतरही मिळवला हिरो-हिरोईनचा रोल; 'रुबाब' फिल्मच्या जोडीचा शॉकिंग प्रवास!

Last Updated:

झी स्टुडिओजचा आगामी चित्रपट 'रुबाब' सध्या आपल्या रांगड्या लूकमुळे आणि जबरदस्त संवादांमुळे चर्चेत आहे.

News18
News18
मुंबई : सिनेसृष्टीत नशिबाचे फासे कधी पालटतील याचा नेम नसतो. कधीकधी रिजेक्शनच यशाची पहिली पायरी ठरतं. झी स्टुडिओजचा आगामी चित्रपट 'रुबाब' सध्या आपल्या रांगड्या लूकमुळे आणि जबरदस्त संवादांमुळे चर्चेत आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर संभाजी ससाणे आणि शीतल पाटील या जोडीने प्रेक्षकांच्या काळजात घर केलंय. पण तुम्हाला माहीत आहे का? आज ज्यांच्या स्वॅगवर दुनिया फिदा आहे, त्या दोघांनाही सुरुवातीला चक्क रिजेक्ट करण्यात आलं होतं.
संभाजी ससाणेची निवड होण्यामागचा किस्सा एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखाच आहे. संभाजी सांगतो, "मला निर्माते संजय झणकर यांचा फोन आला तेव्हा खूप आनंद झाला होता. दिग्दर्शक शेखर रणखांबे आणि संजयजींना भेटायला गेलो तेव्हा मला वाटलं आता ऑडिशन होईल, चर्चा होईल; पण त्यांनी माझ्या तोंडावर सांगितलं की, 'आम्ही जो चेहरा शोधतोय, तू तसा दिसत नाहीस.' ते ऐकल्यावर मी सुन्न झालो. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. दोन-तीन आठवड्यांनंतर पुन्हा फोन आला आणि मला सांगितलं गेलं की तूच आमचा हिरो आहेस!"
advertisement

शीतलचं फ्लॉप ऑडिशन अन् नशिबाची पलटी

हिरोईन शीतल पाटीलचा अनुभव तर त्याहूनही वेगळा होता. तिला वाटलं होतं की एखादी छोटी भूमिका मिळेल. शीतल म्हणते, "जेव्हा मी ऑडिशन दिलं, तेव्हा दिग्दर्शक आणि निर्मात्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून मला खात्री पटली होती की इथे आपलं काहीही होणार नाही. मी तर त्या नादातून बाहेरही पडले होते. पण काही दिवसांनी अचानक लीड रोलसाठी माझा विचार झाल्याचं कळलं आणि माझ्या आनंदाला पारावार उरला नाही."
advertisement

नकार देऊनही त्यांनाच का निवडलं?

दिग्दर्शक शेखर रणखांबे आणि निर्माते संजय झणकर यांनी यामागचं गुपित उलगडलंय. शीतलचं ऑडिशन तेव्हा त्यांना आवडलं नव्हतं, पण त्यांना जो चेहरा आणि जे डोळे हवे होते, ते शीतलकडे होते. वर्कशॉपमध्ये तिने स्वतःला सिद्ध केलं. संभाजीच्या बाबतीतही तेच घडलं. जो रांगडापणा आणि मातीतील रुबाबदार पात्रासाठी हवा होता, तो शेवटी या दोघांच्याच व्यक्तिमत्त्वातून झळकला.
advertisement

६ फेब्रुवारीला रिलीज होणार 'रुबाब'

झी स्टुडिओज प्रस्तुत हा चित्रपट प्रेमाची, स्वाभिमानाची आणि अस्सल मराठमोळ्या स्वॅगची गोष्ट सांगणार आहे. ६ फेब्रुवारी २०२६ पासून हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे. नव्या दमाचे कलाकार जेव्हा नकाराचं पचवून मोठ्या पडद्यावर झळकतात, तेव्हा तो 'रुबाब' काही वेगळाच असतो, हे आता प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
'तू आमच्या कामाचा नाहीस', तोंडावर नकार ऐकल्यानंतरही मिळवला हिरो-हिरोईनचा रोल; 'रुबाब' फिल्मच्या जोडीचा शॉकिंग प्रवास!
Next Article
advertisement
Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement