advertisement

APMC Market: आले, डाळिंब तेजीत, हळदीनंही मार्केट खाल्लं, कुठं मिळाला सर्वाधिक भाव?

Last Updated:

APMC Market: राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीत शेती मालाची कमी-अधिक प्रमाणात आवक झाली. त्यामुळे दरांत देखील मोठे चढउतार राहिले.

+
APMC

APMC Market: आले, डाळिंब तेजीत, हळदीनंही मार्केट खाल्लं, कुठं मिळाला सर्वाधिक भाव?

मुंबई: जानेवारी अखेर राज्यातील कृषी मार्केटमध्ये मोठ्या घडामोडी दिसत आहेत. शुक्रवारी, 30 जानेवारी रोजी राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीत शेती मालाची कमी-अधिक प्रमाणात आवक झाली. त्यामुळे दरांत देखील मोठे चढउतार राहिले. महत्त्वाच्या तीन शेतमालांमध्ये आले, हळद आणि डाळिंबाची आवक आणि त्याचे दर यांबाबत अपडेट जाणून घेऊया.
आल्याच्या आवकेत घट
राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 2278 क्विंटल आल्याची आवक झाली. यापैकी मुंबई मार्केटमध्ये सर्वाधिक 889 क्विंटल आल्याची आवक झाली. त्यास प्रतीनुसार 4000 ते 5400 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच नागपूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 2 क्विंटल आल्यास 5905 रुपये सर्वाधिक सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.
advertisement
हळदीला उच्चांकी भाव
राज्याच्या मार्केटमध्ये एकूण 1013 क्विंटल हळदीची आवक झाली. यापैकी हिंगोली मार्केटमध्ये सर्वाधिक 830 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 13700 ते 16200 रुपये दरम्यान बाजारभाव मिळाला. तसेच मुंबई मार्केटमध्ये 33 क्विंटल हळदीची आवक राहिली. त्यास 20750 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
डाळिंबाच्या दरात चढ-उतार 
आज राज्याच्या मार्केटमध्ये केवळ 1366 क्विंटल डाळिंबाची एकूण आवक झाली. यापैकी नागपूर मार्केटमध्ये 814 क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 2000 ते 6000 रुपये दरम्यान दर मिळाला. तसेच पुणे मार्केटमध्ये आवक झालेल्या 9 क्विंटल डाळिंबास 16000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
APMC Market: आले, डाळिंब तेजीत, हळदीनंही मार्केट खाल्लं, कुठं मिळाला सर्वाधिक भाव?
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement