महागाईचा फटका स्वयंपाक घराला, डाळींचे भाव तब्बल ऐवढ्या रुपयांनी वाढले, कारण काय?
- Reported by:Ravi Shivaji Shikare
- Published by:Mohan Najan
Last Updated:
वणात वरण-भात असल्याशिवाय अनेकांचे पोट भरत नाही, मात्र याच वरणाची चव आता महागाईमुळे कडू झाली आहे.
छत्रपती संभाजीनगर : जेवणात वरण-भात असल्याशिवाय अनेकांचे पोट भरत नाही, मात्र याच वरणाची चव आता महागाईमुळे कडू झाली आहे. गेल्या 21 दिवसांत डाळींच्या बाजारात मोठी तेजी पाहायला मिळत आहे. ठोक विक्रीमध्ये डाळींचे भाव क्विंटलमागे 500 पासून थेट 2000 रुपयांपर्यंत वाढले आहेत. तसेच तूर, उडीद या डाळींसह कोणत्या डाळींचे भाव वाढलेत आणि या भाववाढीची नेमकी काय कारणं आहेत, याबद्दल सविस्तर माहिती डाळींचे व्यापारी वसंत काटकर यांच्याकडून जाणून घेऊ.
डाळींच्या भाववाढीचे नेमके कारण काय?
खरीप हंगामातील तुरीच्या उत्पादनाला मोठा फटका बसला. त्यात बाजारातील तुरीची गुणवत्ता घसरलेली असल्याने चांगल्या तुरीला मागणी आहे. परिणामी, ऐन हंगामात तूरडाळीचे भाव वाढले. तसेच जास्त पाऊस झाल्यामुळे मुगाचे पीक गेले, याबरोबरच उडदाचे पीक खराब झाले. उत्पादन कमी झाले आणि मागणी वाढली त्यामुळे या डाळींमध्ये भाव वाढ झाली. विशेषतः तूर, मूग आणि उडीद या तीन प्रकारच्या डाळींमध्ये भाव वाढ झाली असल्याचे वसंत काटकर यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.
advertisement
डाळींचे भाव किती वाढले?
जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तूर डाळीचे 10 हजार रुपये क्विंटल प्रमाणे होते. सध्या यामध्ये 2 हजार रुपयांची भाव वाढ झाली असून 12 हजार रुपये प्रतिक्विंटल या दराने तूर डाळीची विक्री सध्या सुरू आहे. उडीद डाळीचे एक महिन्यापूर्वी 9 हजार रुपये प्रतिक्विंटल भाव होते, आता मात्र 11 हजार रुपये प्रति क्विंटल भाव पाहायला मिळत आहेत. याबरोबरच मूग डाळीचे यापूर्वी 8 ते 9 हजार रुपये प्रति क्विंटल दर होते आणि सध्याच्या घडीला 10 हजार रुपये प्रति क्विंटल दर आहे.
advertisement
डाळींचे प्रति किलो भाव किती?
तूर डाळीमध्ये चांगल्या दर्जाची डाळ 130 रुपये प्रति किलो दराने विक्री सुरू आहे, तसेच मुगाची डाळ 110 रुपये, चणा डाळ 75 ते 80 रुपये, आणि उडीद डाळ 110 ते 120 रुपये प्रति किलोंचे भाव आहे. या सर्व प्रकारच्या डाळींमध्ये झालेल्या भाव वाढीमुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. मात्र दैनंदिन स्वयंपाकात आणि जेवणात नियमित डाळींचा वापर होतो. त्यामुळे भाव वाढ झाली, असे काटकर यांनी सांगिलते.
Location :
Aurangabad [Aurangabad],Aurangabad,Maharashtra
First Published :
Jan 31, 2026 7:33 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
महागाईचा फटका स्वयंपाक घराला, डाळींचे भाव तब्बल ऐवढ्या रुपयांनी वाढले, कारण काय?







