दुकानाची दिशा आणि प्रवेशद्वार - वास्तुशास्त्रानुसार ज्या दुकानांचे मुख्य प्रवेशद्वार पूर्व दिशेला असते, ती दुकाने सर्वाधिक फायदेशीर मानली जातात. अशा दुकानांमध्ये ग्राहका ओघ वाढतो आणि उत्पन्नात सुधार येते. दक्षिणमुखी दुकाने वास्तूच्या दृष्टीने फारशी चांगली मानली जात नाहीत, परंतु जर मालकाची रास आणि नशीब प्रबळ असेल तर तिथेही चांगली कमाई होऊ शकते.
advertisement
काउंटरची योग्य दिशा - दुकानदार आणि तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे तोंड काम करताना नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेला असावे. काउंटरवर बसताना जर चेहरा पश्चिम किंवा दक्षिण दिशेला असेल, तर ते व्यवसायात अडचणी निर्माण करू शकते. जर दुकान दक्षिण दिशेला असेल आणि समोर अनेक दुकाने असतील, तरीही बसण्याची योग्य दिशा निवडून वास्तू दोष दूर करता येतो.
दुकानाचा आकार - वास्तूनुसार समोरून रुंद आणि मागून अरुंद असलेले दुकान (सिंहमुखी) व्यवसायासाठी अतिशय शुभ मानले जाते. याउलट, मागे मोठे आणि पुढे अरुंद असलेले दुकान व्यवसायासाठी चांगले नसते. चौरस किंवा सर्व बाजूंनी समान आकार असलेल्या दुकानांमध्ये देखील पैशांची आवक चांगली राहते.
दुकानासाठी काही महत्त्वाचे वास्तू नियम - दुकानातील कचरा कधीही दुसऱ्याच्या दुकानासमोर टाकू नका. चौकामध्ये कचरा टाकल्याने आसपासच्या दुकानांच्या आणि तुमच्या कमाईवर परिणाम होतो. काम करताना तोंड नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवा. दुकानात नेहमी स्वच्छता आणि नीटनेटकेपणा ठेवावा.
पुढचे 4 महिने धोक्याचे! कर्कसह 3 राशींच्या वाट्याला त्रास; उत्तराभाद्रपदेत शनी
ग्राहक वाढवण्यासाठी उपाय - दुकानात ग्राहकांची संख्या वाढवण्यासाठी ईशान्य कोपऱ्यात (उत्तर पूर्व) माता लक्ष्मी आणि गणपतीची मूर्ती स्थापित करावी. भिंतीवर शुभ-लाभ आणि स्वास्तिकची चिन्हे काढावीत. कॅश काउंटर नेहमी उत्तर दिशेला ठेवावे आणि ते कधीही पूर्णपणे रिकामे ठेवू नका. रोज सकाळी आणि संध्याकाळी आपल्या कुलदैवताची पूजा करून धूप किंवा दिवा लावावा. दुकानाच्या समोर कोणताही खांब किंवा मोठे झाड नसावे, कारण यामुळे ऊर्जेचा प्रवाह अडकतो.
रंगांची निवड - रंग ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि चांगले वातावरण राहण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. ईशान्य कोपऱ्यासाठी फिकट निळा, करडा किंवा हिरवा रंग शुभ असतो. आग्नेय कोपऱ्यासाठी लाल, गुलाबी किंवा नारंगी रंग वापरावा. वायव्य कोपऱ्यासाठी पांढरा, चंदेरी किंवा मेटालिक रंगाच्या फिकट छटा निवडाव्यात.
टेन्शन सोडा, इतक्या सहज होणार काम; मकर संक्रातीच्या आधीच या राशींना शुभवार्ता
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
