मात्र, शुक्रवारी काही गोष्टी करणे अशुभ मानले जाते. या गोष्टी केल्याने व्यक्तीला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. पंडित रमाकांत मिश्रा यांच्या मते, शुक्रवारी कोणती कामे टाळावीत ते जाणून घेऊया.
शुक्रवारी या गोष्टी करू नयेत: - मांसाहारी पदार्थ आणि मद्यपान टाळावे, यामुळे देवी लक्ष्मी रुष्ट होऊ शकते. शुक्रवार हा देवी लक्ष्मीला समर्पित मानला जातो. या दिवशी पैशाचे व्यवहार करू नयेत, उधार घेऊ नयेत किंवा देऊ नये, यामुळे देवी लक्ष्मी कोपते.
advertisement
शुक्रवारी कोणत्याही प्रकारचे भांडण टाळावे, कारण यामुळे कुंडलीतील शुक्र ग्रह कमकुवत होतो आणि परिणामी आर्थिक नुकसान होऊ शकते.
जास्त ताण-तणाव घेतल्याचा परिणाम! या मूलांकाला गुरुवारी धोक्याचा पहिला इशारा
शुक्र ग्रहाला सौंदर्य आणि समृद्धीचा कारक मानले जाते, त्यामुळे या दिवशी अस्वच्छ, फाटलेले किंवा काळे कपडे घालू नयेत, अन्यथा नकारात्मक परिणाम होऊ शकतो आणि आर्थिक समस्या वाढू शकतात.
शुक्रवारी चांदी, साखर दान करू नये कारण असे केल्याने भौतिक सुखांचा अभाव होऊ शकतो. स्वयंपाकघराशी संबंधित कोणत्याही वस्तू खरेदी करू नयेत, कारण यामुळे पैशाच्या आवकमध्ये घट होऊ शकतो. शुक्रवारी कोणाकडूनही काहीही मोफत घेऊ नये, कारण असे केल्याने कर्ज बुडण्याची शक्यता वाढू शकते.
सगळं संपतंय असं वाटत असताना आशेचा किरण! बुधाचा नक्षत्र बदल या राशींना सावरणार
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)