TRENDING:

Rashibhvishya: या राशींवर होणार धनवर्षा! सूर्याच्या तूळ राशीतील प्रवेशामुळे चमकणार नशीब

Last Updated:

Tula sankranti: नवरात्रीच्या काळात 18 ऑक्टोबरला सूर्य कन्या राशीतून बाहेर पडून तूळ राशीत प्रवेश करेल. या संक्रमणाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येईल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई, 15 ऑक्टोबर : कधी- कधी आपल्याला भविष्य, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या गोष्टींवर विश्वास ठेवावासा वाटतो. काही लोक तर आपल्या दिवसाची सुरुवातच राशी भविष्य वाचून करतात. आपला दिवस कसा जाईल? ही उत्सुकता त्यामागे असते. जे लोक राशी भविष्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यापैकी काही लोकांसाठी एक चांगली बातमी आहे. नवरात्रीच्या काळात 18 ऑक्टोबरला सूर्य कन्या राशीतून बाहेर पडून तूळ राशीत प्रवेश करेल. या संक्रमणाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येईल. या बदलाचा प्रभाव सर्व 12 राशींवर पडणार आहे. मात्र, या पैकी चार राशींच्या लोकांचं नशीब चमकणार आहे.
राशीभविष्य
राशीभविष्य
advertisement

ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य हा पित्याचा कारक मानला जातो. कुंडलीत सूर्याचं स्थान बलवान असेल तर व्यक्तीची करिअर आणि व्यवसायात खूप प्रगती होते. त्याचबरोबर कुंडलीत सूर्याचं स्थान कमकुवत असेल असेल तर जीवनात यश मिळवण्यात अडथळे येतात. त्यामुळे कुंडलीत सूर्याचं स्थान बलवान असणं फार महत्त्वाचं आहे.

ज्योतिष तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, सूर्य दर 30 दिवसांनी आपली रास बदलतो. सध्या सूर्य कन्या राशीत आहे. 18 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजून 29 मिनिटांनी सूर्य कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करेल. या काळात 24 ऑक्टोबरला स्वाती नक्षत्र आणि 7 नोव्हेंबरला विशाखा नक्षत्र असेल. यानंतर 17 नोव्हेंबरला सूर्य वृश्चिक राशीत प्रवेश करेल.

advertisement

नवरात्रीत पूजा करताना अशा गोष्टींची काळजी घ्या, उपवासात या चुका टाळा

सूर्याच्या तूळ राशीतील प्रवेशामुळे खालील चार राशींवर चांगला परिणाम होणार आहे.

1) कन्या (Virgo) - कन्या राशीच्या लोकांसाठी सूर्याचं संक्रमण शुभ परिणाम देणारं आहे. कन्या राशीच्या धन घरामध्ये सूर्याचं संक्रमण होणार आहे. यामुळे या राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. या कालावधीत त्यांना प्रत्येक क्षेत्रात फायदा होईल. सुख-सुविधांमध्ये वाढ होऊ शकते आणि व्यवसायात वाढ होईल.

advertisement

2) धनू (Sagittarius) - तूळ राशीत सूर्याचा प्रवेश झाल्यानंतर तो धनू राशीच्या आर्थिक मिळकतीच्या घरात येईल. अशा परिस्थितीत धनू राशीच्या लोकांची करिअरमध्ये प्रगती होईल. त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. संपत्ती मिळण्याचे नवीन मार्ग मिळू शकतात. धैर्य आणि शौर्य वाढेल. या व्यक्ती परदेश दौऱ्यावर जाऊ शकतात. त्यांना करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात आणि कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील.

advertisement

तुम्हाला कधी विचित्र अनुभव येतात का? जागा बाधित असल्यास असे संकेत जाणवतात

3) मकर (Capricorn) - मकर राशीच्या करिअरच्या घरामध्ये सूर्याचं संक्रमण होणार आहे. अशा परिस्थितीत स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळू शकतं. मकर राशीच्या व्यक्ती नवीन घर किंवा नवीन वाहन खरेदी करू शकतात. या काळात व्यावसायिकांना मोठी ऑर्डर मिळू शकेल. अनपेक्षित पैसे मिळू शकतील.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याचे भाव पुन्हा कोसळले, लिंबू आणि केळीची काय स्थिती? एका क्लिकवर चेक करा
सर्व पहा

4) कुंभ (Aquarius) - कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी सूर्याचं संक्रमण फायदेशीर ठरेल. कारण, सूर्य कुंभ राशीच्या भाग्यस्थानात असेल. या राशीच्या लोकांसाठी नवरात्रीचा काळ खूप शुभ असणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील आणि आर्थिक लाभ होईल. या व्यक्तींचे आपल्या जोडीदाराशी सौहार्दपूर्ण संबंध असतील. त्यांना कुटुंबाकडून सहकार्य मिळेल.

मराठी बातम्या/राशीभविष्य/
Rashibhvishya: या राशींवर होणार धनवर्षा! सूर्याच्या तूळ राशीतील प्रवेशामुळे चमकणार नशीब
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल