मुंबई : हिंदू धर्मपरंपरेनुसार नवीन वर्ष २०२६ मधील पहिला सण म्हणून आज मकर संक्रांती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. देशभरात पतंगोत्सव, तीळगूळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून या सणाचे स्वागत केले जात आहे. मकर संक्रांतीला केवळ सणाचेच नव्हे, तर खगोलशास्त्रीय आणि ज्योतिषीय दृष्टीनेही विशेष महत्त्व आहे. कारण याच दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि उत्तरायणाची सुरुवात होते.
advertisement
ज्योतिषशास्त्रानुसार, २०२६ हे वर्ष ग्रहस्थितीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. या वर्षाचा ‘मंत्री ग्रह’ मंगळ असल्याचे सांगितले जाते. मंगळ हा पराक्रम, उर्जा, संघर्ष आणि आक्रमकतेचे प्रतीक मानला जातो. द्रिक पंचांगानुसार, १४ जानेवारी २०२६ रोजी सूर्य मकर राशीत प्रवेश करणार असून, त्यानंतर १८ जानेवारी २०२६ रोजी मंगळ ग्रहही मकर राशीत प्रवेश करेल. सूर्य आणि मंगळ यांच्या युतीमुळे एक विशेष राजयोग निर्माण होणार आहे, ज्याला ज्योतिषशास्त्रात ‘विस्फोटक राजयोग’ असे संबोधले जाते.
हा योग अनेकदा अशुभ मानला जातो. सूर्य आणि मंगळ दोन्ही उग्र स्वभावाचे ग्रह असल्याने त्यांची युती राशींवर तणाव, संघर्ष, अपयश आणि आर्थिक अडचणी निर्माण करू शकते, असे ज्योतिष तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे या काळात काही राशींना विशेष सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जात आहे.
मेष रास
मेष राशीचा स्वामी ग्रह मंगळ असल्यामुळे सूर्य-मंगळ युतीचा प्रभाव या राशीवर तीव्र स्वरूपात दिसून येऊ शकतो. करिअर आणि आर्थिक बाबतीत घाईघाईने घेतलेले निर्णय नुकसानकारक ठरू शकतात. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ किंवा सहकाऱ्यांसोबत मतभेद वाढण्याची शक्यता आहे. संयम आणि शांततेने परिस्थिती हाताळणे गरजेचे ठरेल.
वृषभ रास
वृषभ राशीच्या व्यक्तींना हा काळ आव्हानात्मक ठरू शकतो. रागावर नियंत्रण ठेवणे कठीण जाईल. कार्यालयीन वातावरणात तणाव वाढू शकतो आणि जबाबदाऱ्यांचा बोजा वाढल्यासारखा वाटेल. रखडलेली कामे पूर्ण होण्यास विलंब होऊ शकतो, त्यामुळे संयम राखणे आवश्यक आहे.
मिथुन रास
मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ मानसिक अस्थिरता निर्माण करणारा ठरू शकतो. संशयी स्वभाव, चिडचिड आणि असुरक्षिततेमुळे वैयक्तिक नात्यांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहार करताना सावध राहणे गरजेचे आहे. कोणताही मोठा निर्णय विचारपूर्वक घ्यावा.
सिंह रास
सिंह राशीच्या लोकांना करिअरशी संबंधित अडचणींचा सामना करावा लागू शकतो. घाईने घेतलेले निर्णय नुकसानकारक ठरू शकतात. सहकाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता असून, वाद टाळण्यासाठी संवादावर भर देणे आवश्यक आहे.
वृश्चिक रास
वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ संवेदनशील असणार आहे. मानसिक तणाव वाढू शकतो आणि कामात अडथळे येऊ शकतात. अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता असल्याने आर्थिक नियोजन महत्त्वाचे ठरेल. आत्मविश्वासात चढ-उतार जाणवू शकतात.
(सदर बातमी फक्त महितीकरिता असून न्यूज 18 मराठी कुठलाही दावा करत नाही)
