TRENDING:

15 मार्चला बनणार 'त्रिग्रही योग', 'या' 3 राशींचं नशीब सोन्यासारखं चमकणार, हवं ते मिळणार!

Last Updated:

ज्योतिषशास्त्रानुसार मार्च 2026 हा महिना ग्रहांच्या अत्यंत दुर्मिळ आणि शुभ युतीचा साक्षीदार ठरणार आहे. 15 मार्च 2026 रोजी ग्रहांचा राजा सूर्य मीन राशीत प्रवेश करेल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Trigrahi Yog 2026 : ज्योतिषशास्त्रानुसार मार्च 2026 हा महिना ग्रहांच्या अत्यंत दुर्मिळ आणि शुभ युतीचा साक्षीदार ठरणार आहे. 15 मार्च 2026 रोजी ग्रहांचा राजा सूर्य मीन राशीत प्रवेश करेल. मीन राशीत आधीच शनी आणि शुक्र विराजमान आहेत. या तिन्ही मोठ्या ग्रहांच्या एकत्र येण्यामुळे 'त्रिग्रही योग' निर्माण होत आहे. हा त्रिग्रही योग विशेषतः 3 राशींच्या जातकांसाठी भाग्योदयाचा काळ घेऊन आला आहे. या काळात तुम्हाला आर्थिक लाभ, करिअरमध्ये प्रगती आणि रखडलेली कामे पूर्ण होण्याची सुवर्णसंधी मिळेल.
News18
News18
advertisement

वृषभ - प्रगतीची नवी दारे उघडणार

वृषभ राशीच्या अराव्या भावात हा त्रिग्रही योग तयार होत आहे. यामुळे तुमच्या उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल, तर हा काळ अत्यंत फायदेशीर ठरेल. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील आणि तुम्हाला नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. जुन्या त्रासातून तुमची सुटका होईल.

advertisement

मिथुन - करिअरमध्ये मोठी क्रांती

मिथुन राशीच्या दहाव्या भावात सूर्य, शनी आणि शुक्राची युती होणार आहे. यामुळे बेरोजगार असलेल्यांना हवी तशी नोकरी मिळण्याचे योग आहेत. व्यवसायात मोठी भरभराट होईल आणि नवीन 'डील्स' मिळतील. तुमच्या कार्यशैलीत सुधारणा होईल, ज्यामुळे तुमची समाजात प्रतिष्ठा वाढेल. रखडलेली पदोन्नती या काळात मिळण्याची दाट शक्यता आहे.

advertisement

कुंभ - अनपेक्षित धनलाभ

कुंभ राशीच्या दुसऱ्या भावात हा योग तयार होत असून, तो तुमच्या आर्थिक स्थितीला बळकटी देईल. वडिलोपार्जित संपत्तीतून तुम्हाला लाभ मिळू शकतो. साडेसातीचा प्रभाव असूनही, शुक्राची साथ लाभल्याने तुमच्या चैनीच्या वस्तूंमध्ये वाढ होईल. बोलण्यातून लोकांवर प्रभाव पाडण्यात तुम्ही यशस्वी व्हाल, ज्यामुळे व्यावसायिक फायदा होईल.

त्रिग्रही योगाचा कालावधी आणि फायदे

advertisement

हा योग 15 मार्चपासून सुरू होईल आणि शुक्र 26 मार्च रोजी मेष राशीत जाईपर्यंत अत्यंत प्रभावी राहील. या 11 दिवसांच्या काळात महत्त्वाचे निर्णय घेतल्यास ते दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरू शकतात. सूर्य हा सत्तेचा कारक आहे. ज्या लोकांची सरकारी कामे प्रलंबित आहेत, ती या काळात मार्गी लागतील. विशेषतः सरकारी कंत्राटदार किंवा राजकारणातील लोकांसाठी हा काळ यशाचा उच्चांक गाठणारा असेल. शुक्राच्या उपस्थितीमुळे घरामध्ये आनंदाचे वातावरण राहील. जोडीदारासोबतचे संबंध सुधारतील आणि तुम्ही एखाद्या धार्मिक किंवा सहलीच्या ठिकाणी प्रवासाचे नियोजन करू शकता. मुलांच्या प्रगतीची बातमी समजल्याने घरातील वातावरण अधिक प्रसन्न होईल.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
AI चा खास कोर्स मोफत शिका! पिंपरी चिंचवडमध्ये कुठे करायची नावनोंदणी?
सर्व पहा

टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

मराठी बातम्या/राशीभविष्य/
15 मार्चला बनणार 'त्रिग्रही योग', 'या' 3 राशींचं नशीब सोन्यासारखं चमकणार, हवं ते मिळणार!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल