ब्रह्मस्थान हे घराच्या सर्व दिशांमधून येणाऱ्या सकारात्मक ऊर्जा (प्राण ऊर्जा) गोळा करण्याचे आणि ती संपूर्ण घरात पसरवण्याचे केंद्र मानले जाते. हे घराच्या ऊर्जा प्रणालीचे हृदय मानले जाते. हे स्थान घरात सकारात्मकता, संतुलन आणि सुसंवाद राखण्यास मदत करते. घरातील सर्वांच्या चांगल्या आरोग्य, समृद्धी आणि मानसिक शांतीसाठी ब्रह्मस्थान स्वच्छ मोकळं असणं आवश्यक आहे. या ठिकाणी ब्रह्मदेवाचा वास असतो असे मानले जाते, त्यामुळे या जागेची पवित्रता राखणे महत्त्वाचे असते.
advertisement
ब्रह्मस्थानाचे नियम -
ब्रह्मस्थान नेहमी मोकळं, स्वच्छ आणि त्यावर काहीही नसावं. ब्रह्मस्थानावर फर्निचर, जड वस्तू किंवा इतर कोणताही अनावश्यक सामान ठेवू नये. येथे जास्त गर्दी किंवा पसारा असल्यास सकारात्मक ऊर्जा कमी होते, ज्यामुळे घरात नकारात्मकता येऊ शकते. ब्रह्मस्थानात कुठल्याही प्रकारचे बांधकाम (उदा. भिंत, खांब, शौचालय, स्वयंपाकघर, जिना, खांब) नसावे. या गोष्टी वास्तुदोष निर्माण करतात.
ब्रह्मस्थानाच्या ठिकाणी भिंत असल्यास घरातील लोकांना छातीचे किंवा पोटाचे आजार होण्याची शक्यता असते असे मानले जाते.
जिना असल्यास घरातील व्यक्तींना आरोग्य समस्या आणि आर्थिक नुकसान होऊ शकते. शौचालय किंवा स्वयंपाकघर असल्यास ते अत्यंत अशुभ मानले जाते, ज्यामुळे गंभीर वास्तुदोष निर्माण होतात.
ब्रह्मस्थानात नैसर्गिक हवा आणि पुरेसा सूर्यप्रकाश येणे आवश्यक आहे. यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते. आजकालच्या अपार्टमेंटमध्ये हे शक्य नसल्यास, किमान हे स्थान मोकळे आणि हवेशीर राहील याची काळजी घ्यावी. या ठिकाणी पाण्याचा कोणताही स्रोत (उदा. जमिनीखाली विहीर, बोअरवेल, भूमिगत पाण्याची टाकी) नसावा. तसं आरोग्यासाठी आणि आर्थिक स्थितीसाठी हानिकारक मानले जाते. ब्रह्मस्थान हे घरातील इतर भागांपेक्षा उंचावर नसावे. ते जमिनीच्या पातळीवर किंवा किंचित खोल ठेवू शकता, पण उंचावर नसावे.
आताच नियोजन लावा! जूनचा शेवट या राशींसाठी खडतर, एक काम धड नीट होणार नाही
ब्रह्मस्थानाचे फायदे (योग्य असल्यास) -
घरातील सगळ्यांचे आरोग्य चांगले राहते. घरात सकारात्मक ऊर्जा असल्याने मन शांत आणि स्थिर राहते. आर्थिक स्थिरता येते आणि कामात यश मिळते. घरातील लोकांमध्ये प्रेम आणि सलोखा वाढतो. एकूणच घरातील वातावरण आनंददायी आणि सकारात्मक राहते. जर तुमच्या घरातील ब्रह्मस्थानात काही वास्तुदोष असतील (उदा. भिंत, शौचालय), तर वास्तुतज्ञाचा सल्ला घेणे आवश्यक आहे. काही सोपे उपाय तात्पुरते केले जाऊ शकतात.
ब्रह्मस्थानात नियमितपणे दिवा लावणे किंवा धूप-अगरबत्ती लावणे. तेथे ओम (ॐ) किंवा स्वस्तिक (卍) चे शुभ चिन्ह लावणे. येथे नेहमी स्वच्छता राखणे. घराचे ब्रह्मस्थान हे घराचा आत्मा मानले जाते. ते योग्य आणि स्वच्छ ठेवल्यास घरात सुख, समृद्धी आणि आरोग्य नांदते.
पुन्हा घात-अपघात! 24 तासात राहु-चंद्राचा घातक योग; 4 राशींना सगळ्यात मोठा अलर्ट
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)