'या' लोकांना करावा लागतो शनी देवाच्या क्रूर नजरेचा सामना
जे खोटी साक्ष देतात, गरिबांना त्रास देतात आणि त्यांच्या पाठीमागे इतरांबद्दल वाईट बोलतात त्यांना शनीचा क्रोध भोगावा लागतो. जे आपल्या वडिलांचा अपमान करतात त्यांनाही शनीचा क्रोध भोगावा लागतो. देवावर विश्वास नसलेल्या आणि प्राणी आणि पक्ष्यांना त्रास देणाऱ्यांवरही शनीची क्रूर नजर असते. गरीब, महिला आणि असहाय्य लोकांचे हक्क हिरावून घेणाऱ्यांनाही शनीचा कोप सहन करावा लागतो. जे लोक त्यांच्या सभोवतालच्या परिसराकडे किंवा वैयक्तिक स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतात किंवा गोष्टी अस्वच्छ ठेवतात त्यांनाही शनीचा कोप सहन करावा लागतो. शिवाय, जे मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी मांस आणि मद्यपान करतात त्यांनाही शनीचा कोप सहन करावा लागतो.
advertisement
आयुष्यात अडचणी येतातच
शनिदेवाची क्रूर नजर जीवनात संकटे आणते. जेव्हा जेव्हा शनी देवाचा कोप होतो तेव्हा तेव्हा त्या व्यक्तीला अणे अडचणींचा सामना करावा लागतो. ज्यांच्यावर शनीचा कोप होतो त्या व्यक्तीला प्रत्येक पावलावर अडथळे येतात. त्यांच्या कुटुंबात आव्हाने निर्माण होऊ शकतात. त्यांचे जवळच्यांशी असलेले नातेसंबंध बिघडू शकतात. एवढेच नाही तर अशा व्यक्तीला अनेक आव्हानांना समोर जावं लागत.
या गोष्टी लक्षात ठेवा
शनिदेवाच्या क्रूर नजरेला तोंड देऊ नये आणि त्यांचे आशीर्वाद मिळवावेत म्हणून, या सर्व गोष्टींपासून दूर राहावे. तसेच, चांगले कर्म करावे. चांगले कर्म केल्याने शनिदेव त्रास देत नाहीत आणि त्यांचे आशीर्वाद मिळतात. व्यक्ती जितके चांगले काम करेल आणि लोकांचं कल्याण करेल तेवढी शनी देवाची कृपा त्या व्यक्तीवर राहते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
