TRENDING:

बाईकने चांगलं मायलेज द्यावं असं वाटतंय? मग लगेच करा ही 5 कामं 

Last Updated:

पेट्रोलच्या वाढत्या खर्चामुळे त्रस्त आहात का? मग कोणत्याही महागड्या पार्ट किंवा एडिटिव्हशिवायही तुमची बाईक 4-8 kmpl जास्त मायलेज देऊ शकते. फक्त रोजच्या 5 सवयी तुम्हाला लावाव्या लागतील. ज्याचा परिणाम 7-8 दिवसात दिसू लागेल. लहानशी सावधगिरी दरमहा 300-500 रुपयांची बचत करुन घेऊ शकते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : सध्याच्या काळात पेट्रोल-डिझेलच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. यामुळे सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. एक सामान्य बाईक ओनर दरमहा 1500-2000 रुपये फक्त इंधनावर खर्च करतो. तुमची बाईक 40-45 kmpl च्या जागी 50-55 kmpl देत असेल तर दरमहा 300-500 रुपये थेट बचत होऊ शकते. चांगलं मायलेज फक्त पैसे वाचवत नाही तर इंजिनला स्वस्थ ठेवते. प्रदुषण कमी करते आणि बाईकची रीसेल व्हॅल्यूही वाढवते.
बाइम मायलेज
बाइम मायलेज
advertisement

जास्तीत जास्त लोक महागडे अडिटिव्स किंवा पार्ट्स बदलण्यात पैसे लावतात. तर खरा फरक लहान-लहान सवयींनी होतो. या सवयी फॉलो करायला कोणतेही पैसे लागत नाही. तर फक्त जागरुकता हवी आहे. या आर्टिकलमध्ये आम्ही तुम्हाला 5 असे उपाय सांगणार आहोत. जे बाईकचं मायलेज वाढवण्यात तुमची मदत करतील. या फॉलो करताच 7-15 दिवसात 4-8 kmpl पर्यंत फरक दिसू शकतो.

advertisement

टायर प्रेशर दर आठवड्यात चेक करा 

सर्वात मोठा शत्रू हा कमी हवेचा टायर आहे. टायरमध्ये हवा कमी असते तव्हा रोलिंग रेजिस्टेंस वाढतो आणि इंजिनला जास्त मेहनत करावी लागते. यामुळे 8-10% मायलेज खाली येते. दर रविवारी सकाळी गार टायरमध्ये मॅन्युअलमध्ये लिहिलेलं प्रेशर (सामान्यतः 28-32 PSI फ्रंट, 32-36 PSI रियर) भरा. फक्त एका पंपने 2-3 kmpl चा फायदा होऊ शकतो.

advertisement

किती दिवस बसचे धक्के खाणार? 39 हजारांमध्ये घरी आणा Bike, भारतातल्या टॉप स्वस्त 5 बाईक्स

स्मूथ रायडिंग सवयी लावा 

अचानक अ‍ॅक्सिलरेटर दाबल्याने, ब्रेक लावल्याने आणि 60-70 kmph वेग ओलांडल्याने मायलेज कमी होतो. 40-55 kmph  वेगाने योग्य गियर ठेवा. ट्रॅफिकमध्ये क्लचचा जास्त वापर टाळा; इंजिन ब्रेकिंग शिका. फक्त तुमची गाडी चालवण्याची स्टाइल बदलल्याने मायलेज 5-7 kmpl वाढू शकते. गाडी चालवल्याने फायदा होईल, पळवल्याने नाही.

advertisement

एयर फिल्टर आणि स्पार्क प्लग स्वच्छ ठेवा 

धुळीने भरलेला एयर फिल्टर इंजिनमध्ये कमी हवा जाऊ देते. ज्यामुळे मिक्सचर रिच होते आणि पेट्रोल वेस्ट होते. प्रत्येक 3000-4000 KM वर एयर फिल्टर स्वच्छ करा किंवा बदला. स्पार्क प्लगही प्रत्येक 8000 KM वर चेक करा. हे दोन्ही कामं 200-300 रुपयांत होतात. मात्र 3-5 kmpl मायलेज वाढवतात.

advertisement

अनावश्यक वजन अजिबात उचलू नका

बाइकवर 10 किलो एक्स्ट्रा वजन (मोठी लॉक, हेलमेट, पाण्याच्या बॉटल) प्रत्येक 100 KM वर 0.3-0.5 लिटर जास्त पेट्रोल लागते. रोज फक्त आवश्यक सामान ठेवा. कोणतीही वजनदार बॅक टांगू नका. हलकी बाईक नेहमी जास्त मायलेज देते.

5 हजारांच्या डाउन पेमेंटवर Honda Activa खरेदी केल्यास EMI किती येईल? पाहा डिटेल्स

योग्य इंजिन ऑइल आणि नियमित सर्व्हिसिंग

जुने किंवा चुकीच्या ग्रेड ऑइल इंजिनचे घर्षण वाढवते. नेहमी कंपनीने शिफारस केलेले 10W-30 किंवा 20W-40 सेमी-सिंथेटिक ऑइल वापरा आणि दर 3000-4000 KM अंतरावर ते बदला. तुमच्या सर्व्हिसिंगमध्ये कार्बोरेटर/फ्युएल इंजेक्टर क्लीनिंगचा समावेश असल्याची खात्री करा. हा एक-वेळचा खर्च एका वर्षात सहजपणे वसूल केला जातो.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पाय गमावला Cricket सोडलं नाही! व्हिलचेअरवर मॅच खेळणाऱ्या ओंकारची गोष्ट!
सर्व पहा

तुम्ही पुढील 15 दिवस या पाच स्टेप्स काटेकोरपणे फॉलो केल्या तर तुम्हाला त्याचे परिणाम स्वतः दिसून येतील. कोणतेही महागडे गॅझेट, कोणतेही अॅडिटिव्ह्ज नाहीत, फक्त जागरूकता आणि शिस्त हे काम करेल. तुमच्या बाईकचे मायलेज खूपच कमी झाले असेल किंवा ती खूप कमी इंधन एफिशियंसी देऊ लागली असेल, तर ती मेकॅनिककडे घेऊन जा.

मराठी बातम्या/ऑटो/
बाईकने चांगलं मायलेज द्यावं असं वाटतंय? मग लगेच करा ही 5 कामं 
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल