TRENDING:

खराब रस्ते आणि खड्ड्यांमुळे प्रॉब्लम होतो? अशी वाढवा गाडीचा ग्राउंड क्लियरेन्स

Last Updated:

भारतीय रस्त्यांवर वारंवार कार खाली टक्कर घेत असल्याने मोठी समस्या होते. पण तुम्ही मोठा खर्च न करता आपल्या कारचे ग्राउंड क्लियसेन्स 10 ते 40 mm पर्यंत वाढवू शकता. कॉयल स्प्रिंग असिस्टर्सपासून तर टायर अपग्रेडपर्यंत, जाणून घ्या कोणती पद्धत तुमच्यासाठी सर्वात योग्य आणि सुरक्षित राहील.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
How to increase ground clearance of your car: कारचा ग्राउंड क्लियसेन्स (जमिनीपासून कारच्या खालच्या भागाचे अंतर कमी असणे) कमी असल्यावर भारतीय रस्त्यांवर स्पीड ब्रेकर, खड्डे आणि खराब रस्त्यांवर खुप त्रास होतो. बंपर स्क्रॅच होणे, अंडरबॉडीने टक्कर होणे किंवा सायलेंसरचा नुकसान सामान्य होतो. चांगली गोष्ट म्हणजे, ग्राउंड क्लियसेन्स वाढम्याचे अनेक व्यावहारिक रस्ते उपलब्ध आहे.
ग्राउंड क्लियरेन्स
ग्राउंड क्लियरेन्स
advertisement

बहुतेक भारतीय कार मालक प्रथम कॉइल स्प्रिंग असिस्ट (सर्वात सुरक्षित आणि स्वस्त) बसवतात, नंतर आवश्यक असल्यास त्यांचे टायर अपग्रेड करतात. हे सहजपणे 20-40 mm वाढ प्रदान करते आणि स्पीड ब्रेकर/खड्ड्यांची समस्या लक्षणीयरीत्या कमी करते. तसंच, कोणतेही बदल करण्यापूर्वी, एका चांगल्या मेकॅनिक किंवा कार तज्ञाचा सल्ला घ्या आणि तुमच्या कार मॉडेलसाठी योग्य पर्याय निवडा. तुम्ही तुमच्या कारचा ग्राउंड क्लीयरन्स कसा वाढवू शकता ते सविस्तरपणे समजून घेऊया.

advertisement

मारुती सुझुकीची पहिली ई-एसयूव्ही eVitaraची एंट्री! फक्त 21 हजारांत करु शकता बुक

1. कॉइल स्प्रिंग असिस्टर्स 

ही पद्धत भारतात सर्वात जास्त वापरली जाते. कारण ती कमी खर्चात 10-25 mm पर्यंत ग्राउंड क्लियसेन्स वाढवते. कॉलइल स्प्रिंग असिस्टर्स पॉलीयूरेथेन किंवा रबरने बनलेले छोटे-छोटे पॅड/बफर असतात. ज्यांना कारच्या कॉइल स्प्रिंगमध्ये फीट केले जाते. हे स्प्रिंग पूर्ण खाली जाण्यापासून रोखतात. ज्यामुळे लोड किंवा खड्ड्यात कारचा खालचा भाग कमी खाली येतो.

advertisement

फायदे: किंमत 800-2500 रुपये(4-पीस सेट). बसवणे सोपे आहे, 1-2 तास लागतात.

अतिरिक्त लिफ्ट: साधारणपणे 15-25 mm(कार मॉडेलवर अवलंबून).

खबरदारी: खूप जाड असिस्ट वापरणे टाळा, कारण यामुळे राइडची क्वालिटी खराब होऊ शकते आणि स्प्रिंग तुटण्याचा धोका वाढू शकतो.

2. मोठ्या साइजचे टायर आणि रिम अपग्रेड करणे 

ही दुसरी सर्वात सामान्य पद्धत आहे. ओरिजिनल टायरपेक्षा थोडा मोठा (उदाहरणार्थ - 185/70 R14 च्या जागी 195/65 R15 किंवा 205/60 R16) टायर लावल्याने टायरचा व्यास वाढतो आणि ग्राउंड क्लीयरेन्स 8-20 mm पर्यंत वाढते.

advertisement

TCS ने सादर केली स्मार्ट कार! झोप आल्यावर हलवेल सीट, स्वतःच होईल पार्क

फायदा : हँडलिंगमध्ये जास्त फरक पडत नाही फक्त योग्य साइज निवडा.

स्पीडोमीटरमध्येही कमी चुका होतात.

खर्च : 15,000-40,000 रुपये (4 टायर + रिम).

खबरदारी: मोठ्या आकाराचे टायर बसवल्याने फेंडर घर्षण होऊ शकते. स्पीडोमीटर चुकीचा असू शकतो, इंधन कार्यक्षमता थोडी कमी होऊ शकते आणि ABS/ट्रॅक्शन कंट्रोलवर परिणाम होऊ शकतो. तसेच, कृपया RTO नियमांचे पालन करा.

advertisement

3. अधिक कडक सस्पेंशन सेटअपमध्ये अपग्रेड करणे

तुमचे बजेट कमी असेल, तर मूळ सॉफ्ट सस्पेंशनऐवजी कडक स्प्रिंग्ज आणि शॉक अ‍ॅब्झॉर्बर्स (बिल्स्टाईन, कोनी किंवा गॅब्रिएल्स सारखे आफ्टरमार्केट) वापरण्याचा विचार करा.

फायदा : 20-40mm पर्यंत वाढ शक्य, राइड क्वालिटी चांगली कंट्रोलची होते. बॉडी रोल कमी होतो.

खर्च : 25,000-80,000 रुपये ( फुल सेटअप).

सावधगिरी : राइड खुप कठोर होऊ शकते, खराब रस्त्यांवर असुविधा वाढू शकते.

4. स्पेसर किंवा लिफ्ट किट लावणे 

काही लोक सस्पेंशनमध्ये मेटल स्पेसर किंवा लिफ्ट किट लावतात. यामुळे 30-50 mm पर्यंत वाढ होऊ शकते.

फायदा : जास्त वाढ.

नुकसान : जास्तीत जास्त लोक याला अनुशंसित करत नाही कारण एलाइनमेंट बिघडते. सीव्ही जॉइंटवर प्रेशर वाढतो. हँडलिंग खराब होऊ शकते आणि दीर्घकाळानंतर नुकसान होते.

बोनस टिप्स 

  • कारमध्ये अनावश्यक सामान कमी ठेवा. (वजन कमी असल्याने स्प्रिंग कमी दबते.)
  • चांगल्या कंडीशनचे टायर ठेवा. (कमी एयर असल्यावर ग्राउंड क्लीयरेन्स कमी होतो.)
  • स्पीड ब्रेकरवर हळुहळू आणि अँगल बनवून चला.
  • कार खुप जुनी असेल तर स्प्रिंग्स पहिलेच सेटल झालेली असते. नवीन स्प्रिंग लावल्याने 10-20 mm फायदा होऊ शकतो.
  • टॉप व्हिडीओज

    सर्व पहा
    एकाच शेतात घ्या वेगवेगळी पिकं, सोपी पद्धत अन् उत्पन्नातही वाढ, असा हा फॉर्म्युला
    सर्व पहा

मराठी बातम्या/ऑटो/
खराब रस्ते आणि खड्ड्यांमुळे प्रॉब्लम होतो? अशी वाढवा गाडीचा ग्राउंड क्लियरेन्स
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल