सर्वात स्वस्त चेतक
सध्या, बजाज ऑटोने नवीन चेतक ३००१ ही सर्वात स्वस्त ट्रिम असलेल्या २९०३ मॉडेलची जागा घेईल की नाही, याची चर्चा आहे. नवीन आणि स्वस्त स्कुटरमुळे बजाजच्या विक्रीच्या संख्येत सुधारणा होण्याची शक्यता आहे. चेतक ३००१ मध्ये नवीन ३.१ किलोवॅट क्षमतेची इलेक्ट्रिक मोटर असेल. या स्कुटरचा टॉप स्पीड ६२ किमी/तास असेल. याशिवाय, त्यात ३ किलोवॅट क्षमतेची बॅटरी असेल. चेतक २९०३ मध्ये २.९ किलोवॅट क्षमतेची बॅटरी आहे ज्याचा टॉप स्पीड ६३ किमी/तास आहे आणि दावा केला आहे की, १२३ किमीचा रेंज आहे. ० ते ८०% पर्यंत चार्जिंग वेळ ४ तास आहे.
advertisement
क्लासिक डिझाइन
बजाज चेतकच्या क्लासिक डिझाइनसह त्याच्या सध्याच्या लूकमध्ये पाहण्यास मिळेल. चेतक ३००१ ची लांबी १,९१४ मिमी, उंची १,१४३ मिमी आणि रुंदी ७२५ मिमी असेल. इलेक्ट्रिक स्कूटरचा ग्राउंड क्लीयरन्स १६८ मिमी आहे आणि तो पुढच्या आणि मागच्या बाजूला १२-इंच व्हिल असणार आहे.
किती असेल किंमत?
चेतकची सर्वात स्वस्त ट्रिम २९०३ आहे, त्यानंतर चेतक ३५०३, चेतक ३५०२ आणि टॉप मॉडेल चेतक ३५०१ आहेत. दुसऱ्या जनरेशनमधील चेतक लाइनअप ३५०३ साठी १.१० लाख रुपये, ३५०२ साठी १.२२ लाख रुपये आणि ३५०१ साठी १.३४ लाख रुपयांपासून सुरू होते. चेतक ३००१ ची एक्स-शोरूम किंमत सुमारे १ लाख रुपये असण्याची शक्यता आहे.