- जेव्हा तुम्ही कार चालवतात त्यावेळी सर्वात आधी एअर कंडिशनर चालू करा आणि लो किंवा १ नंबरवर ठेवा. त्यानंतर, काही वेळ एअर कंडिशनर त्याच वेगाने चालवल्यानंतर तो बंद करा. गाडी थंड ठेवण्यासाठी, गाडीच्या खिडक्या थोड्या कमी कराव्यात जेणेकरून गाडीत हवा येत जात राहिल आणि एअर कंडिशनरशिवायही, उन्हाळ्यात तुमच्या गाडीचे केबिन थंड राहू शकते.
advertisement
लगेच कार पळवू नका - जेव्हा तुम्ही तुमची कार घराबाहेर किंवा ऑफिसबाहेर पार्क करता तेव्हा उन्हाळ्याच्या दिवसात गाडीचे केबिन खूप गरम होणार हे साहजिक आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही तुमची कार घेऊन लगेच निघून गेलात तर तुम्हाला गाडी चालवण्यात खूप अडचण येऊ शकते. जर तुम्हाला असं होऊ नये असं वाटत असेल, तर तुम्ही गाडीत बसण्यापूर्वी ५ ते १० मिनिटं दरवाजे उघडे ठेवा. असं केल्यामुळे आत असलेली उष्णता पूर्णपणे निघून जाते आणि गाडी चालवताना तुम्हाला एअर कंडिशनर पूर्ण वेगाने चालू ठेवावे लागत नाही.
कार शेड वापरा - तुम्हाला एअर कंडिशनर पूर्ण वेगाने चालवण्याची गरज पडू नये म्हणून, तुम्ही कार शेड्स वापरावे जेणेकरून कारचे केबिन गरम होणार नाही. यानंतर तुम्हाला एअर कंडिशनर जास्त वेगाने चालवण्याची गरज नाही.
मारुती वॅगन आरमध्ये मिळेल ४० किमी मायलेज
जर तुम्ही मारुती सुझुकी वॅगन आर सीएनजी चालवत असाल तर तुम्हाला प्रति किलोग्रॅम अंदाजे ३५ किलोमीटर मायलेज मिळतं. जर तुम्ही अशा प्रकारे एअर कंडिशनर वापरला आणि गाडी इकॉनॉमी मोडमध्ये ठेवली तर तुम्हाला प्रति किलोग्रॅम अंदाजे ४० किमी मायलेज मिळेल.