TRENDING:

नेहमीच मॅगी खाऊन कंटाळा आलाय? बनवा खास भेळ, रेसिपीचा संपूर्ण Video

Last Updated:

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना मॅगी खायला खूप आवडते. आज मॅगीची भेळ कशी करायची याची सोपी रेसिपी बघणार आहोत. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
‎छत्रपती संभाजीनगर : लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना मॅगी खायला खूप आवडते. आपल्यापैकी अनेकांचं कम्फर्ट फूड म्हणजे मॅगी असतं. आपण वेगवेगळ्या प्रकारच्या मॅगी खात असतो ज्यामध्ये चीज मॅगी, मसाला मॅगी किंवा इतरही मॅगी. पण मॅगी तर आपण नेहमीच खातो तुम्ही कधी मॅगीची भेळ ट्राय केली आहे का? तर आपण आज मॅगीची भेळ कशी करायची याची सोपी रेसिपी बघणार आहोत.
advertisement

मॅगी भेळसाठी लागणारे साहित्य

एक वाटी मॅगी, मॅगी मसाला, टोमॅटो केचप, चाट मसाला, लाल तिखट, लिंबाचा रस, मीठ, कोथिंबीर, हिरवी मिरची, टोमॅटो आणि कांदा एवढेच साहित्य याकरता तुम्हाला लागणार आहे.

मॅगी भेळ कृती

सर्वप्रथम एका पॅनमध्ये एक चमचा तेल टाका आणि त्यामध्ये मॅगी टाका. मॅगी ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करा. त्यानंतर गॅस बंद करावा. हे थंड झाल्यानंतर यामध्ये आता आपण जे घेतलेले मसाले आहेत ते टाकणार आहोत. साधारणपणे अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा चाट मसाला, एक चमचाभर मॅगी मसाला, लिंबाचा रस, टोमॅटो केचप, टोमॅटो, हिरवी मिरची आणि कांदा हे टाकून घ्यायचे. याला एकत्र एकजीव करून घ्यायचे आणि त्यानंतर यावरून हिरवी कोथिंबीर टाकायची आहे. (एक चमचा म्हणजे तुम्ही पोहे खायचा चमचा न घेता जो छोटा चमचा आहे तो आपला तो घेऊन प्रमाण घ्यायचा आहे.)

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नेहमीच मॅगी खाऊन कंटाळा आलाय? बनवा खास भेळ, रेसिपीचा संपूर्ण Video
सर्व पहा

अशा पद्धतीने ही मॅगीची भेळ तयार होते. जास्त तेल देखील वापर यामध्ये होत नाही आणि यावरून तुम्ही हिरवी कोथिंबीर टाकून गार्निशिंग करून खाऊ शकता. एकदम छान टेस्टी लागते तुम्हाला देखील खूप असे आवडेल.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
नेहमीच मॅगी खाऊन कंटाळा आलाय? बनवा खास भेळ, रेसिपीचा संपूर्ण Video
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल