आरोग्यासाठी हेल्दी, सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा ज्वारीच्या धिरड्यांची खास रेसिपी, सोप्या पद्धतीचा Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Bhavna Arvind Kamble
Last Updated:
ज्वारी हे ग्लूटेन-फ्री धान्य असून त्यामध्ये भरपूर फायबर, प्रोटीन आणि जीवनसत्त्वे असतात, जे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. त्यामुळे नाश्त्यासाठी किंवा हलक्या जेवणासाठी ज्वारीचे धिरडे हा एक उत्तम आणि आरोग्यदायी पर्याय म्हणून समोर येत आहे.
मुंबई : आजच्या वेगवान आणि धकाधकीच्या जीवनशैलीत आरोग्याची काळजी घेणे ही काळाची गरज बनली आहे. बाहेरच्या तेलकट आणि प्रक्रिया केलेल्या अन्नामुळे अनेक आरोग्य समस्या वाढताना दिसत आहेत. त्यामुळे घरगुती, पौष्टिक आणि सहज बनणाऱ्या पदार्थांकडे लोकांचा कल वाढत आहे.
विशेषतः पारंपरिक धान्यांपासून बनवलेले पदार्थ पुन्हा एकदा लोकप्रिय होत आहेत. अशाच पौष्टिक आणि ग्रामीण परंपरेचा वारसा जपणाऱ्या पदार्थांमध्ये ज्वारीचे धिरडे हा एक अत्यंत उपयुक्त आणि चविष्ट पर्याय ठरतो. ज्वारी हे ग्लूटेन-फ्री धान्य असून त्यामध्ये भरपूर फायबर, प्रोटीन आणि जीवनसत्त्वे असतात, जे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. त्यामुळे नाश्त्यासाठी किंवा हलक्या जेवणासाठी ज्वारीचे धिरडे हा एक उत्तम आणि आरोग्यदायी पर्याय म्हणून समोर येत आहे.
advertisement
ज्वारीच्या धिरड्यांसाठी साहित्य
ज्वारीचे पीठ – 1 कप
तांदळाचे पीठ – अर्धा कप
बारीक चिरलेला कांदा – 1
बारीक चिरलेले गाजर – 1
बारीक चिरलेले टोमॅटो – 1
हिरवी मिरची – 1-2 (चिरलेली)
कोथिंबीर – 2 टेबलस्पून
मीठ – चवीनुसार
जिरे – ½ टीस्पून
पाणी – आवश्यकतेनुसार
तेल – शेकण्यासाठी
ज्वारी धिरडे कृती
एका भांड्यात ज्वारीचे पीठ घ्या. त्यात कांदा, टोमॅटो, गाजर, मिरची, कोथिंबीर, जिरे आणि तांदळाचे पीठ, मीठ घालून मिक्स करा.
advertisement
हळूहळू पाणी घालून पातळसर पीठ तयार करा (डोश्याच्या पिठासारखे). तवा गरम करून थोडे तेल लावा. तयार पीठ तव्यावर घालून हलक्या हाताने पसरवा. दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत शेकून घ्या.
सर्व्हिंग:
गरमागरम धिरडे लोणी, दही किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 27, 2026 5:31 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
आरोग्यासाठी हेल्दी, सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा ज्वारीच्या धिरड्यांची खास रेसिपी, सोप्या पद्धतीचा Video






