'कौन बनेगा करोडपती' मधून झाली लखपती, बाहेर येऊन लोकांना घातला गंडा! आता जेलची हवा खातेय KBC विनर
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
केबीसीमध्ये एखादा स्पर्धक जेव्हा मोठी रक्कम जिंकतो, तेव्हा त्याच्या बुद्धीमत्तेचं खूप कौतुक होतं. मात्र, नुकतंच एक प्रकरण समोर आलं आहे, ज्याने संपूर्ण देशाला हादरवलं आहे.
भोपाळ : भारतातील सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या रिअॅलिटी शोपैकी एक असलेला कार्यक्रम म्हणजे कौन बनेगा करोडपती. गेली कित्येक वर्षे हा शो प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. सामान्य ज्ञानावर आधारित असलेल्या या गेम शोमध्ये सहभागी होण्यासाठी लोक धडपडत असतात. मात्र, नुकतंच एक प्रकरण समोर आलं आहे, ज्याने संपूर्ण देशाला हादरवलं आहे. या शोमधून लखपती झालेल्या एका स्पर्धकाला अडीच कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे.
केबीसीमध्ये एखादा स्पर्धक जेव्हा मोठी रक्कम जिंकतो, तेव्हा त्याच्या बुद्धीमत्तेचं खूप कौतुक होतं. मध्यप्रदेशातील जिल्ह्याच्या तहसीलदार अमिता सिंह तोमर यांच्यासोबतही असंच काहीसं घडलं. मात्र, सध्या जे प्रकरण समोर आलं आहे, त्यामुळे त्यांच्यावर तोंड लपवण्याची वेळ आली आहे. अमिता सिंह यांनी अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉटसीटवर बसून ५० लाख रुपये जिंकले होते, त्याच अमिता यांचं नाव अडीच कोटींच्या घोटाळ्यामध्ये घेतलं जात आहे. २०२१ सालच्या प्रकरणात त्यांचा सहभाग आढळला आहे.
advertisement
तहसीलदाराने हडपले पूरग्रस्तांचे पैसै
२०२१ साली श्योपूर जिल्ह्यात भीषण महापूर आला होता आणि सरकारने पूरग्रस्तांना मदत म्हणून मोठी रक्कम जाहीर केली होती. अमिता सिंह तोमर या तेव्हा त्या भागाच्या तहसीलदार होत्या. आता अमिता यांच्यावर असा आरोप आहे की, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आलेल्या रकमेपैकी तब्बल २.५७ कोटी रुपये त्यांनी बनावट खात्यांमध्ये वळवले आहेत. अमिता यांनी २५ पटवारी आणि १०० हून अधिक दलालांच्या मदतीने हे पैसे आपल्या नातेवाईकांच्या आणि ओळखीच्या लोकांच्या १२७ बनावट खात्यांत जमा केले.
advertisement
डेप्युटी डेप्युटी कलेक्टरने जेव्हा ऑडिट केलं, तेव्हा या गैरव्यवहाराचा पर्दाफाश झाला आणि संपूर्ण महसूल विभागात खळबळ उडाली होती. दरम्यान, घोटाळा उघडकीस आल्यानंतर अमिता सिंह तोमर यांनी अटक टाळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्यांनी आधी हायकोर्टात धाव घेतली, पण तिथे त्यांची जामीन याचिका फेटाळली गेली. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केली होती, मात्र तिथूनही त्यांना कोणताही दिलासा मिळाला नाही. अखेर पोलिसांना त्यांना अटक केली असून त्या सध्या तुरुंगात आहेत.
advertisement
बिग बींसोबतचा फोटो होतोय व्हायरल
दरम्यान, अमिता सिंह तोमर यांना अटक झाल्यानंतर त्यांचे केबीसीमधील फोटो पुन्हा एकदा व्हायरल होत आहेत. आपल्या ज्ञानाच्या जोरावर लाखो रुपये जिंकणारी ही अधिकारी आता भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकली आहे. या प्रकरणात आणखी काही बड्या अधिकाऱ्यांची नावं समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 27, 2026 5:04 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'कौन बनेगा करोडपती' मधून झाली लखपती, बाहेर येऊन लोकांना घातला गंडा! आता जेलची हवा खातेय KBC विनर







