advertisement

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द, अहिल्यानगरच्या नगरसेवकाला काढलं सभागृहाबाहेर; मोठा गोंधळ

Last Updated:

नगरसेवक श्रीपाद छिंदम यांना सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी सभागृहातून बाहेर काढल्याची घटना घडली आहे.

News18
News18
अहिल्यानगर : अहिल्यानगर महापालिकेच्या अंदाजपत्रकीय सभेत आज मोठा गोंधळ पाहायला मिळाला. छत्रपती शिवाजी महाराजांबाबतच्या आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणामुळे वादात असलेले अपक्ष नगरसेवक श्रीपाद छिंदम यांना सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी सभागृहातून बाहेर काढल्याची घटना घडली. या प्रकारामुळे काही काळ सभागृहात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
महापालिकेची अंदाजपत्रकीय सभा सुरू असताना नगरसेवक श्रीपाद छिंदम यांनी चर्चेत सहभागी होण्याचा प्रयत्न केला. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या कथित अपमानाच्या मुद्द्यावर नगरसेवकांनी तीव्र आक्षेप घेतला. राष्ट्रवादी काँग्रेससह इतर पक्षांच्या नगरसेवकांनी छिंदम यांना सभागृहात बसू देऊ नये, अशी भूमिका घेतली. यामुळे सभागृहातील वातावरण अचानक तापले आणि काही नगरसेवक आक्रमक होत त्यांच्या दिशेने धावले.
advertisement

नेमकं काय घडलं?

अखेर सर्व नगरसेवकांनी मिळून श्रीपाद छिंदम यांना सभागृहाबाहेर नेले. संबंधित व्यक्तीला सभागृहात प्रवेश देऊ नये तसेच याबाबत कायदेशीर निर्णय घ्यावा, अशी मागणी नगरसेवकांनी केली. पुढील सभेत हा विषय अजेंड्यावर न घेतल्यास सभागृहावर बहिष्कार टाकण्याचा इशाराही देण्यात आला आहे. श्रीपाद छिंदम समोर असलेला माईक आणि अर्थसंकल्पाचे कागद फेकून दिले.
advertisement

आपल्या जीवाला धोका, श्रीकांत छिंदम यांची पोलीसात तक्रार

अपक्ष नगरसेवक श्रीकांत छिंदम यांनी मात्र वेगळा आरोप केला आहे. सभेत आपण बजेटच्या विरोधात भूमिका घेतली आणि अंदाजपत्रक चुकीचे असल्याचे मांडल्यामुळे जाणीवपूर्वक छत्रपती शिवाजी महाराजांचा मुद्दा उपस्थित करून आपल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. तसेच आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार त्यांनी पोलीस अधीक्षक सोमनाथ घाडगे यांच्याकडे दिली आहे.
advertisement

महाराजांचा अपमान करणाऱ्याविरोधात आम्ही कायम भूमिका घेणार

ज्या व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, त्याला सभागृहात प्रवेश देऊ नये. याबाबत ठोस निर्णय घ्यावा, ही आमची भूमिका आहे. महाराजांचा अपमान करणाऱ्याविरोधात आम्ही कायम भूमिका घेणार आहोत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द, अहिल्यानगरच्या नगरसेवकाला काढलं सभागृहाबाहेर; मोठा गोंधळ
Next Article
IPL 2026 : 'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
  • मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...

  • IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा

  • नेमकं काय घडलं?

View All
advertisement