चंडीगडमध्ये फॅन्सी नंबर प्लेट विकण्यासाठी नुकताच लिलाव पार पडला आहे. दरवर्षी हा लिलाव होत असतो. पण, यंदा या लिलावामध्ये नवा रेकॉर्ड झाला आहे. रजिस्टरिंग आणि लायसेंसिंग अथॉरिटीने आयोजित केलेल्या ई-लिलावात CH01-DD-0001 याा नंबर प्लेटसाठी तब्बल 53.88 लाखांची बोली लागली आणि विकलीही गेली. हा चंडीगडच्या इतिहासातला एका नंबर प्लेटसाठी इतके जास्त पैसे मोजण्याचा अजब रेकॉर्ड ठरला आहे.
advertisement
लिलावातून 4.48 कोटींची कमाई
हा लिलाव 4 ते 6 मार्च 2026 दरम्यान पा पडला. यामध्ये CH01-DD सीरिज (0001 ते 9999) आणि मागील सीरिजचे उरलेले नंबरही होते. एकूण 591 नंबर विकले गेले. या लिलावातून लायसेंसिंग अथॉरिटीला तब्बल 4.48 कोटींची कमाई झाली, जी चंडीगडच्या इतिहासातली सर्वाधिक आहे. CH01-DD-0001 नंबरसाठी जोरदार रस्सीखेच सुरू होती. हा 0001 सीरिजचा टॉप नंबर असल्यामुळे चंदीगडमध्ये जाास्त लोकप्रिय आहे. त्यामुळे प्रतिष्ठा जपणाऱ्या मंडळींकडून या नंबरसाठी वाटेल ती किंमत देण्याची तयारी होती.
| नंबर प्लेट | सगळ्या मोठी बोली |
| 0001 | ₹५३.८ लाख |
| 0003 | ₹३२.३ लाख |
| 0005 | ₹१७.५ लाख |
| 0009 | ₹१४.४ लाख |
| 0007 | ₹१४.२ लाख |
| 1000 | ₹९ लाख |
| 0006 | ₹८.५ लाख |
| 0008 | ₹८.२ लाख |
| 0002 | ₹७.२ लाख |
| 0100 | ₹६.२ लाख |
मागील वर्षी काय घडलं?
मागील वर्षी ऑगस्ट 2025 मध्ये CH01-DA-0001 साठी या नंबर प्लेटसाठी 36.43 लाखांची बोली लागली होती. इतर टॉप नंबरमध्ये CH01-DD-0003 32.32 लाखात आणि CH01-DD-0005 ही चांगल्या किंमतीत विकले गेले होते. हा नंबर माजी महापौर आणि भाजप नेते दवेश मौद्गिल यांनी विकत घेतला होता. दवेश मौद्गिल यांनी आपल्या Toyota Fortuner Legender एसयूव्हीसाठी हा नंबर प्लेट विकत घेतला होता. गंमत म्हणजे. या एसयूव्हीची किंमत जवळपास 50 लाख आहे. पण, नंबर प्लेटसाठी त्यांनी ३६.४३ लाख रुपये मोजले.
चंडीगडमध्ये फॅन्सी नंबर घेणे हा एक ट्रेंडचा विषय बनला आहे. इथं लोक 0001, 9999, एकसारखे अंक जसे 7777, 1111 किंवा सहज लक्षात राहणारे कॉम्बिनेशन नंबरला जास्त पसंती देतात. ही ऑनलाईन बोली दरवर्षी पार पडते. यासाठी आधी रजिस्ट्रेशन करावे लागते. ५० हजार रुपयांपासून रिझर्व्ह किंमत सुरू होते. दिल्ली, मुंबई आणि इतर शहरातही VIP नंबर प्लेटसाठी कोट्यवधी रुपये मोजले जातात. पण चंडीगड हे सगळ्या शहरांपेक्षा वेगळं ठरलं आहे.
