हिरोची अशीही ऑफर
Vida VX2 दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. गो आणि प्लस. प्रत्येक ट्रिम बॅटरी अॅज अ सर्व्हिस (BaaS) पर्याय किंवा मालकीसह मिळू शकते, BaaS सबस्क्रिप्शन निवडणाऱ्या खरेदीदारांना बॅटरीसाठी प्रति किमी ०.९६ रुपये भाडे द्यावं लागणार आहे. VIDA ची बॅटरी-अॅज-अ-सर्व्हिस (BaaS) योजना प्रति किमी सबस्क्रिप्शन मॉडेल देते, ज्यामुळे महाग असलेली ईव्ही स्कुटर आणखी स्वस्त ग्राहकांना मिळते.
advertisement
रेंज किती?
बेस VX2 Go व्हेरिएंटमध्ये २.२ kWh बॅटरी आहे, जी एका चार्जवर ९२ किमी रेंज देण्याचा दावा कंपनीने केला आहे. तर टॉप-स्पेक VX2 Plus मध्ये ३.४ kWh बॅटरी आहे जी एका चार्जवर १४२ किमी रेंज देते. Hero मध्ये AC फास्ट चार्जिंग पर्याय देखील देण्यात आला आहे, जी फक्त ६० मिनिटांत बॅटरी ० ते ८० टक्के चार्ज होते. ५८०W चार्जरचा वापर करून, Go व्हेरिएंटची बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी ३ तास ५३ मिनिटं लागतात.
७० किमीचा टॉप स्पीड
तसंच, VX2 Go मध्ये दोन रायडिंग मोड दिले आहेत. इको आणि राइड, तर प्लस मध्ये या दोन आणखी स्पोर्ट मोड आहे. VX2 Go चा टॉप स्पीड ७० किमी प्रतितास आहे, तर प्लसचा टॉप स्पीड ८० किमी प्रतितास आहे. Hero Vida VX2 मध्ये सीटखाली दोन काढता येण्याजोग्या बॅटरी आहेत. या सहजपणे काढता येतात आणि घरी चार्ज करता येतात, ज्यामुळे ग्राहकांना आणखी सोईचं होतं.
फिचर्स
Vida VX2 मध्ये पूर्ण LED इल्युमिनेशन, GPS ट्रॅकिंग, रिमोट इमोबिलायझेशन, ४.३-इंच पूर्ण डिजिटल कलर TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ३३.२-लिटर अंडर-सीट स्टोरेज जे पूर्ण-आकाराचे हेल्मेट आरामात बसतं. मागील पिलियन बॅकरेस्ट, १२-इंच डायमंड कट फिनिश अलॉय व्हील्स, फ्रंट डिस्क ब्रेक आणि बरेच असे फिचर्स दिले आहे.