महाराष्ट्रात सध्या वाहनधारकांकडून हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (HSRP) लावण्यात उशीर होत आहे. काही टाळाट करतात तर काहींना नंबर मिळत नाही अशी समस्या आहे. आता याचं गांभीर्य सरकारनं ओळखलं आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिकसारख्या मोठ्या शहरांमध्ये RTO आणि पोलिसांची संयुक्त तपासणी मोहीम सुरू झाली आहे. रस्त्यांवर थांबवून गाड्यांची तपासणी केली जात आहे.
advertisement
HSRP नंबर प्लेटसाठी लागतात 'ही' कागदपत्र, तुमच्याकडे सगळी आहेत का?
तुमच्याकडे अजूनही वेळ आहे. 10 दिवस शिल्लक आहेत. या 10 दिवसांत तुम्ही हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्या नाहीतर 10 हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाण्याची शक्यता आहे. हाय सिक्युरिटी नंबर प्लेट विशिष्ट नंबर प्लेट आहे. या नंबरप्लेटच्या मदतीनं सहज ट्रॅफिक पोलीस स्कॅन करुन संपूर्ण माहिती घेऊ शकतात. यूनिक कोड असलेली, सरकारी मान्यता प्राप्त, आणि वाहन चोरी टाळण्यासाठी महत्त्वाची मानली जाते. केंद्र सरकारने 2019 पासून नवीन वाहनांकरता ही प्लेट बंधनकारक केली होती. पण आता जुन्या वाहनांनाही ती बसवून घेणं अनिवार्य केलं आहे.
जर तुमचं वाहन 1 एप्रिल 2019 पूर्वी गाडी घेतलेलं असेल, आणि त्यावर अजून HSRP नाही, तर तुम्ही नियम मोडताय. आणि त्याचाच फटका दंडाच्या स्वरूपात बसू शकतो. 5000 ते 10,000 रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. RTO मान्यताप्राप्त विक्रेत्यांकडून तुम्ही ही प्लेट ऑर्डर करू शकता. यासाठी तुम्हाला चार्जेस भरावे लागणार आहेत. तुमच्याकडे 30 जून शेवटची तारीख आहे. त्याआधी तुम्ही हे करुन घेणं आवश्यक आहेय