घाबरू नका
तुमच्या कारचं ब्रेक काम करत नसेल तर सर्वात आधी स्वतःला शांत ठेवा. घाबरुन निर्णय घेऊ नका. स्टीयरिंग मजबूतीने पकडा आणि गाडीला कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा. जेणेकरुन तुम्ही कोणालाडी धडक देणार नाही.
वारंवार ब्रेक पॅडल दाबा
यानंतर लगेच वारंवार ब्रेक बॅडल दाबण्याचा प्रयत्न करा. अनेकदा सिस्टममध्ये किरकोळ प्रॉब्लम असतो. जो वारंवार ब्रेक दाबल्याने दुरुस्त होऊ शकतो. यामुळे ब्रेक पुन्हा काम करू लागते आणि गाडीची स्पीड कमी होण्यात मदत होते.
advertisement
EV मार्केटमध्ये धमाका! XEV 9S ने Nexon सह Windsor ला चारली धूळ, विक्रीत ठरली अव्वल
इंजिन ब्रेकिंगचा वापर करा
ब्रेकिंग पॅडल काम करत नसल्यास गाडीची स्पीड कमी करण्यासाठी गियर डाउन करा. म्हणजेच गाडी हळु-हळू लोअर गियरमध्ये आणा. यामुळे इंजिनवर दबाव वाढतो आणि गाडी आपोआप स्लो होते.
हँड ब्रेकचा योग्य वापर
गाडीचा वेग थोडा कमी होईल, तेव्हा तुम्ही हँड ब्रेकचा वापर करू शकता. मात्र याचा वापर हळुहळू करा. अचानक जोरात हँड ब्रेक लावल्याने गाडी घसरू शकते किंवा कँट्रोलच्या बाहेर जाऊ शकते.
CNG: किती दिवस छोट्या कारमध्ये फिरायचं? 28 किमी मायलेज अन् किंमत 6 लाखांपासून, टॉप 5 CNG SUV
गाडी सुरक्षित ठिकाणी न्या
गाडी रस्त्याच्या कडेला किंवा एखाद्या सुरक्षित ठिकाणी नेण्याचा प्रयत्न करा. आजुबाजूला रिकामी जागा, मातीचा रस्ता किंवा हलका चढ दिसला तर गाडी तिकडे न्या. गाडी आपोआप हळुहळू थांबू लागते.
या काळामध्ये हिंमत ठेवणे खुप गरेजचे असते. यासोबतच विचारपूर्वक निर्णय घेणं गरजेचं आहे. घाई-घाईत किंवा घाबरुन निर्णय घेतल्यास स्थिती बिघडू शकते. योग्य निर्णय घेऊन स्वतःला सुरक्षित ठेवू शकता.
