TRENDING:

Tata Sierra ला टक्कर द्यायला आली Kia Seltos, किंमत अखेर जाहीर, फिचर्सही जबरदस्त

Last Updated:

किया इंडियाने आपली Kia Seltos 2026 लाँच केली होती. आता Kia Seltos 2026 ची किंमतही जाहीर करण्यात आली आहे. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
भारतात सध्या जीएसटीच्या दरात कपात झाल्यानंतर स्वस्ताईची लाट आली आहे. दिवाळीमध्ये बंपर विक्रीनंतर आता वाहन उत्पादक कंपन्यांनी नवीन वर्षांत नव्याने सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी टाटाने आपली लिजेंड सियारा लाँच केली आहे. आता सियाराला टक्कर देण्यासाठी दक्षिण कोरियन कंपनी किया इंडियाने आपली Kia Seltos 2026 लाँच केली होती. आता Kia Seltos 2026 ची किंमतही जाहीर करण्यात आली आहे.  भारतीय ग्राहक डोळ्यासमोर ठेवून फिचर्सने भरपूर असलेली Kia Seltos 2026 ची किंमत 10.99 लाख रूपयांपासून (एक्‍स-शोरूम) सुरू होणार आहे.
 Kia Seltos 2026
Kia Seltos 2026
advertisement

किया मोटर्स इंडियाने १० डिसेंबर २०२५ रोजी Kia Seltos 2025 लाँच केली होती. जवळपास ६ वर्षांनंतर Kia Seltos चा नवीन अवतार कंपनीने मार्केटमध्ये आणला आहे. नवीन Kia Seltos 2025 ही प्रीमियम आणि टेक्नालॉजीने सुसज्ज आहे. हाय टेक डिझाइन, लेव्हल-2 ADAS सेफ्टी आणि दमदार इंजिनचा ऑप्शन दिला आहे.  या एसयूव्हीची लांबी ही 4,460 मिमी आणि रुंदी 1,830 मिमी आहे, जी या सेगमेंटमध्ये सर्वात मोठी आणि लांबीची SUV आहे. लांबी जास्त असल्यामुळे Kia Seltos 2025 आरामदायक अशीच आहे.

advertisement

Kia Seltos 2026 ची किती आहे किंमत? 

Kia Seltos 2026 मध्ये स्टँडर्ड ट्रिमसह HTE, HTK, HTX आणि GTX असे ट्रिम दिले आहे. सोबतच एक खास X-Line हा व्हेरियंटही उपलब्ध आहे. सोबतच Convenience, Premium आणि ADAS पॅकेजसह ग्राहक हे Kia Seltos 2026 आपल्या गरजेनुसार SUV ला कस्टमाईज करू शकतात.  या एसयूव्हीची किंमत १०.९९ लाखांपासून सुरू होते.

advertisement

Kia Seltos 2026 मध्ये फिचर्स

Kia Seltos 2026 ची ४,४६० मिमी लांबी,  १,८३० रूंदी आणि २,६९० मिमी लांब व्‍हीलबेससह ही एसयूव्‍ही रस्‍त्‍यावर सर्वांचे लक्ष वेधून घेते, तसंच केबिनमध्‍ये एैसपैस जागा आहे.  Kia Seltos 2026 मध्ये नवीन डिजिटल टायगर फेस, ऑटोमॅटिक स्‍ट्रीमलाइन डोअर हँडल्‍स आणि डायनॅमिक वेलकम फंक्‍शनसह आइस क्‍यूब एलईडी प्रोजेक्‍शन हेडलॅम्‍प्‍स आहेत. आकर्षक आर१८ (४६.२ सेमी) स्‍पोर्टी क्रिस्‍टल कट अलॉई व्‍हील्‍ससह निऑन ब्रेक कॅलिपर्स, इंटीग्रेटेड रिअर स्‍पॉयलरसह हिडन रिअर वायपरमधून आधुनिक सिल्‍हूट दिले आहे.  या आकर्षक नवीन डिझाइनसह ऑल-न्‍यू किया सेल्‍टोस १० मोनोटोन रंग पर्याय, तसेच मॉर्निंग हेझ व मॅग्‍मा रेड या दोन नवीन रंगांमध्‍ये उपलब्‍ध असेल.

advertisement

Kia Seltos 2026 मध्ये ७५.१८ सेमी (३० इंच) त्रिनिटी पॅनोरॅमिक डिस्‍प्‍ले पॅनेलसोबत डबल डी-कट ड्युअल टोन लेदरेट-रॅप्‍ड स्‍टीअरिंग व्‍हील, सर्वोत्तम प्रीमियम बोस ८-स्‍पीकर ऑडिओ सिस्‍टम असे फिचर्स दिले आहेत.  तसंच वायरलेस अँड्रॉईड ऑटो आणि अॅप्‍पल कारप्‍ले, वायरलेस डिजिटल कनेक्टिव्ही मिळते.

Kia Seltos 2026  मध्ये १०-वे पॉवर ड्रायव्‍हर सीटसह पॉवर लम्‍बर अॅडजस्‍ट व सर्वोत्तम रिलॅक्‍सेशन फंक्‍शनसह ओआरव्‍हीएम सेटिंग्‍जसोबत कनेक्‍टेड इंटीग्रेटेड मेमरी ड्रायव्‍हर सीट, पुढील बाजूस हवेशीर सीट्स वेलकम रिट्रॅक्‍ट सीट फंक्‍शन आणि ड्युअल पेन पॅनोरॅमिक सनरूफ यासह इतर सर्वोत्तम फिचर्स दिले आहे.

advertisement

Kia Seltos 2026 इंजिन कसं? 

Kia Seltos 2026 मध्‍ये स्‍मार्टस्‍ट्रीम जी१.५ पेट्रोल, स्‍मार्टस्‍ट्रीम जी१.५ टी-जीडीआय पेट्रोल आणि १.५ लिटर सीआरडीआय व्‍हीजीटी डिझेल इंजिनचा समावेश आहे, तसंच ६एमटी, ६आयएमटी, आयव्‍हीटी, ७डीसीटी व ६एटी असे विविध ट्रान्‍समिशन पर्याय आहेत.

Kia मोटर्सची 'फ्यूचर-रेडी' एसयूव्ही

किया इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ग्‍वांगू ली म्‍हणाले की, "आमची 'ऑल-न्‍यू किया सेल्‍टोस' ही खऱ्या अर्थाने सेल्टोस ब्रँडच्या प्रगतीचे प्रतीक आहे. याच ब्रँडने भारतात कियाच्या प्रवासाला एक नवी ओळख मिळवून दिली आहे. नवीन जनरेशनच्या या मॉडेलमधून ग्राहकांना प्रशस्त जागा, सुरक्षितता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा जबरदस्त अनुभव मिळेल. मिड-एसयूव्ही श्रेणीमध्ये एक नवीन मानक प्रस्थापित करून ग्राहकांना जास्तीत जास्त मूल्य देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा हा धोरणात्मक दृष्टिकोन बाजारातील आमचे स्थान अधिक मजबूत करेल आणि ग्राहकांचा विश्वास जिंकेल. आपल्या 'BADASS' वारशाला जागत, आधुनिक भारतीय कुटुंबांसाठी ही एक 'फ्यूचर-रेडी' एसयूव्ही देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत."

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
'मुलांना न्याय मिळाला पाहिजे, अन्यथा मी..',जरांगे यांनी MPSC आंदोलनात दिला इशारा
सर्व पहा

कियाच्‍या अनंतपूर प्‍लांटमध्‍ये ऑल-न्‍यू किया सेल्‍टोसचं उत्‍पादन सुरू झालं आहे, तसंच किंमतीच्‍या घोषणेसह ग्राहक या एसयूव्‍हीचे मालक बनण्‍याच्‍या जवळ पोहोचले आहे, ज्‍याला उत्तमरित्‍या नियोजित उत्‍पादन आणि डिलिव्‍हरी सुविधेचे पाठबळ आहे.

मराठी बातम्या/ऑटो/
Tata Sierra ला टक्कर द्यायला आली Kia Seltos, किंमत अखेर जाहीर, फिचर्सही जबरदस्त
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल